Home / चंद्रपूर - जिल्हा / ब्रम्हपुरी / ब्रम्हपुरी-आरमोरी चौकात...

चंद्रपूर - जिल्हा    |    ब्रम्हपुरी

ब्रम्हपुरी-आरमोरी चौकात अवैध प्रवासी वाहणाने वाहतुकीची कोंडी

ब्रम्हपुरी-आरमोरी चौकात अवैध प्रवासी वाहणाने वाहतुकीची कोंडी

ब्रम्हपुरी : दैनंदिन जीवनात प्रवास हा महत्वाचा भाग, सुखमय प्रवास होवून आपण आनंदाने आपल्या ठिकाणावर पोहचावे हे सर्वांना अपेक्षित मात्र आरमोरी चौक ब्रम्हपुरी येथे लगतच्या गावखेड्या कडे जाणाऱ्यांची संख्या अधिक व शहरातील मध्यवर्ती भाग असल्याने नेहमी मोठी वर्दळ असते तर तिथे अवैध प्रवासी वाहनांची मोठी गर्दी होतं असल्याने, वाहतुकीची कोंडी निर्माण होतं ब्रम्हपुरी -आरमोरी चौक अपघात प्रवण स्थळ ठरत असल्याचे दिसून येत आहे.

ब्रम्हपुरी हे मोठया बाजार पेठेचे ठिकाण असल्याने गाव खेड्याकडे जाणारे प्रवासी जास्त आणि परिवहन मंडळाचे वाहन कमी त्यातच महामंडळाचे सुरु असलेले संप अश्या अवस्थेत अवैध खाजगी प्रवासी वाहतूक वाहणांनी डोके बाहेर काढले असून जास्तीत जास्त नागरीक नाईलाजास्तव खाजगी प्रवासी वाहणाने प्रवास करतांना बघायला मिळतात त्यामुळे आरमोरी चौकात खाजगी वाहणाचा भरमसाठ वावर दिसून येत आहे. तर त्यांच्यात आपआपसात होणाऱ्या स्पर्धेमुळे वाहने भरधावं वेगात चालवणे कधी रस्त्यावर प्रवासी चढवणे- उतरवणे असले गैरप्रकार होतं असल्याने तिथून जाण्या-येणाऱ्यांना नेहमी मोठा त्रास सहन करावा लागतो तर कधी प्रसंगी अपघाताचा सामना देखील करावा लागतो दररोज त्या ठिकाणी कधी मोठे तर कधी किरकोळ अपघात होत असतात तर काही प्रसंगात निष्पाप जीवाचे बळी गेल्याचे प्रकार सुद्धा घडले आहेत.

स्थानिक कर्तव्यदक्ष पोलीस प्रशासनाने नागरिकांच्या जीविताशी संवेदनशील अश्या गंभीर प्रकरणावर प्रसंगावधान राखून वेळीच लक्ष देत कर्तव्यदक्षता दाखवावी व पूर्णवेळ वाहतूक शिपाई नियुक्त करून होणाऱ्या अपघातावर आळा घालून,वाहतूक कोंडी सोडवावी अशी मागणी शहरातील सुज्ञ नागरिकांकडून होतं आहे.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

ब्रम्हपुरीतील बातम्या

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू*

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

पोलिसवाला गुंड सुधाकर अंभोरे याने ट्रॅव्हल्स चालकाचे डॊके फोडले

घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...

भरे चौराहे मे थानेदार सुधाकर अंबोरे ने ट्रॅव्हल्स चालक का डंडे से सर फोडा

ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...