Home / विदर्भ / व्यापारी संघटना कॅटकडून...

विदर्भ

व्यापारी संघटना कॅटकडून आज भारत बंदचे आवाहन, विदर्भातही पळसाद.

व्यापारी संघटना कॅटकडून आज भारत बंदचे आवाहन, विदर्भातही पळसाद.

नवी दिल्ली दि. 25 (वृत्तसंस्था):   देशभरातील व्यापार्‍यांची संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स अर्थात कॅटकडून जीएसटीच्या नियमांच्या समीक्षेची मागणी करत आज शुक्रवार, दि. 26 रोजी  भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. यात विदर्भात सुद्धा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.त्याचे सर्वत्र पळसाधं उमटले आहे.   व्यापार्‍यांकडून ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनवर ताबडतोब बंदी लावण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
भारत बंदला देशभरातील बाजार बंद राहणार आहेत.  सर्व प्रकारचे व्यापार ठप्प राहणार आहेत. देशातील सर्व राज्यातील व्यापार्‍यांच्या संघटनांनी बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे, असा दावा कॅटकडून करण्यात आला आहे.
कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया आणि राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 फेब्रुवारी रोजी आपले म्हणणे मांडण्यासाठी दिल्लीसह देशभरातील जवळपास दीड हजार ठिकाणी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.  या दिवशी व्यापार्‍यांकडून जीएसटी पोर्टलवर लॉग इन न करता आपला विरोध दर्शवण्याची योजना आखण्यात आली आहे. देशभरात व्यापार्‍यांचा हा विरोध तर्कसंगत आणि शांतीपूर्ण पद्धतीने पार पडेल. होलसेल आणि रिटेल बाजार पूर्णत: बंद राहतील. अत्यावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने मात्र या बंदमधून वगळण्यात येतील, असेही कॅटकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
इंधन भाववाढीच्या पार्श्‍वभूमीवर कॅटच्या भारत बंदला ऑल इंडिया ट्रान्स्पोर्ट वेल्फेअर असोसिएशनकडूनही समर्थन मिळाले आहे. 26 फेब्रुवारी रोजी चक्का जाम करण्याची योजनाही आखण्यात आली आहे. कॅटसोबत देशभरातील जवळपास 40 हजारांहून अधिक व्यापारी भारत बंदचे समर्थन करत आहेत.
गेल्या चार वर्षात जीएसटी नियमांत आत्तापर्यंत जवळपास 950 बदल करण्यात आले आहेत. जीएसटी पोर्टलवर अनेकदा तांत्रिक बिघाड आणि नियम पाळण्याचे ओझे या व्यवस्थेच्या प्रमुख त्रुटी आहेत. जी एस टी प्रणाली सरळ आणि साधी करतानाच एखादा सामान्य व्यापारीही सहजगत्या जी एस टी तरतुदी पाळू शकेल अशी त्याची योजना असावी अशी मागणी व्यापाऱ्यांची आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरातील कायदा,  सुव्यवस्था व वाहतूक प्रश्नावर आळा घाला नाही तर रत्यावर ऊतरू, रामनवमी समितीच्या वतीने रवि बेलुरकर यांचा इशारा. 29 December, 2024

वणी शहरातील कायदा, सुव्यवस्था व वाहतूक प्रश्नावर आळा घाला नाही तर रत्यावर ऊतरू, रामनवमी समितीच्या वतीने रवि बेलुरकर यांचा इशारा.

वणी:- वणी पोलिस स्टेशन येथे कर्तव्य बजावत असलेल्या अधिकाऱ्यांना वर कमाईची चटक लागल्याणे कर्तव्य बजाविण्या कडे दुर्लक्ष...

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर 29 December, 2024

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

विदर्भतील बातम्या

वर्धा जिल्ह्यात भाजपाचे संघटनकार्य प्रशंसनीय : डॉ. अशोक जीवतोडे

वणी: भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ओबीसी मोर्चाचे वर्धा जिल्हा प्रभारी डॉ. अशोक जीवतोडे...

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या*

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या*

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...