वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
गडचांदूर (प्रतिनिधी) :- गडचांदूर येथील प्रभाग क्र.२ मधील जोगी नगरात काही लोकांनी मागील अंदाजे ३ ते ४ वर्षापूर्वी प्लॉट खरेदी केले होते.त्यावेळी रोड,नाली व ईतर मुलभुत सोईसुविधा पुरविण्याची हमी संबंधित व्यक्तीकडून देण्यात आली होती.मात्र अजुनही यातील कोणतीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नसल्याने सदर नगरातील प्लॉट धारकांनी २५ आगस्ट रोजी नगरपरिषद येथे जावुन मुख्याधिकारी डॉ.विशाखा शेळकी यांची भेट घेऊन आपबीती सांगितली व सोईसुविधा पुरविण्याची विनंती निवेदनाद्वारे केली.
सविस्तर असे की,गडचांदूर येथील प्रभाग क्रं.२ जोगी नगरातील रहिवासीयांनी कमी दरात विना अकृषक प्लाॅट पुर्वीचे बांधकाम सभापती व आताचे नगरपरिषद उपाध्यक्ष शरद जोगी यांच्याकडून खरेदी केले होते.सदरचे प्लाॅट खरेदी करताना उपाध्यक्ष जोगी यांनी असे म्हटले होते की,या प्लॉटची नगरपरिषदेत फेरफार नोंद करून देतो,तुम्हाला शौचालय व घरकुलाची योजना देतो,रोड नालीचे बांधकाम करून देतो,विद्युतची व्यवस्था करून देतो, अशाप्रकारे आश्वासन दिले होते असे या प्लॉट धारकांचे म्हणणे आहे.त्यामुळे आम्ही त्यांच्या बोलण्यावर विश्वास टाकले व आमच्या मोलमजूरीचे पैसे गोळा करून त्यांच्याकडून प्लाॅट खरेदी केले.त्याठिकाणी आम्ही तीन वर्षापासून आमच्या स्वतःच्या झोपड्या बांधून कुटुंबांसह राहत आहो असे त्यांचे म्हणणे आहे.
परंतू यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या सोईसुविधा अजूनही यांच्या माध्यमातून झालेल्या नाही. राहण्यासाठी पक्के घर नाही,अनेक लोकांकडे शौचालय नाही,विद्युत नाही, सांडपाणी वाहून जाण्यास नाली नाही, ये-जा करण्यासाठी रोडवर साधे खडीकरण नाही.त्यामुळे आम्हाला त्या नगरात राहून जिवन जगणे कठीण झाले आहे.नाल्या नसल्याने ठिकठिकाणी सांडपाणी साचत असल्याने डासांचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढलेले आहे.आरोग्य धोक्यात आले असून विषारी जंतू,कीटक(साप,विंचु) मोठ्याप्रमाणात निघत आहे,विद्युत नसल्याने रात्रीच्या सुमारास सर्वत्र काळोखाचे साम्राज्य पसरलेले असते, त्यामूळे रात्री घराबाहेर निघने भीतीचे बनले आहे.पावसाळ्यात रस्ते पुर्णपणे चिखलमय असल्याने घरापर्यंत जाने वा घरातून बाहेर निघने कठीण होऊन बसले आहे,घरकुलाचे लाभ घेण्यासाठी नगरपरिषदेत आमच्या नावाची नोंद नाही,त्यामूळे आम्हाला शासनाच्या घरकुल योजनेपासून वंचित राहावे लागत आहे.अशाप्रकारची व्यथा या प्लॉट धारकांनी दिलेल्या निवेदनातून मांडली आहे.
आमचे जोगी नगरात आपण प्रत्येक्ष भेट देवून आमच्या समस्या जाणून घ्याव्या व सोईसुविधा पुराव्या अशी विनंती निवेदनातून करण्यात आली असून अन्यथा आम्हाला आंदोलन,मोर्चे,उपोषण अशा संवैधानिक मार्ग अवलंबावा लागेल आणि त्यापासून होणाऱ्या परिणामास सर्वश्री जबाबदारी आपल्यावर राहील असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.आता नगरपरिषद यांना कितपत न्याय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...