Home / चंद्रपूर - जिल्हा / तीन अल्पवहीन मुलींना...

चंद्रपूर - जिल्हा

तीन अल्पवहीन मुलींना चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेनी पुण्यातून सुखरूप घरी आणले..!

तीन अल्पवहीन मुलींना चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेनी पुण्यातून सुखरूप घरी आणले..!

याप्रकरणी चार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात..!

चंद्रपूर (जिल्हा-प्रतिनिधी):- स्थानिक गुन्हे शाखेने वरोरा तालुक्यातील तीन अल्पवयीन मुलींची पुणे येथून सुटका केली  असुन चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. सविस्तर वृत्त असे की, दि.२७/०९/२०२१ रोजी वरोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन अल्पवयीन मुली त्यांचा मैत्रीणचा वाढदिवस असल्याचे सांगून सकाळच्या वेळीच ह्या मुली घरून निघुन गेल्या होत्या. मुली सायंकाळ पर्यंत घरी परत न आल्याने मुलींच्या आई वडीलांनी व ईतर नातेवाईकांनी मुलींचा सर्वत्र शोध घेतला मात्र कोणत्याही मैत्रिणी, तसेच परिचित लोकांना त्यांच्याबद्दल कुठलीही माहिती नसल्याने मुलींचा शोध लागु शकला नाही त्यामुळे अखेर मुलींच्या नातेवाईकांनी पो.स्टे. वरोरा येथे दिनांक 28 सप्टेंबर रोजी मुलींना  कोणीतरी अज्ञात इसमांनी फुस देऊन घेऊन गेल्याची माहिती देत  वरोरा पोलिसांनी अप.क. ७२७/ २०२१, ७२८/२०२१ कलम ३६३ भा.द.वी. अन्वये अज्ञात आरोपी विरुद्ध मुलींना फुस लावून पळवून नेल्या बाबत गुन्हा दाखल करून तपासकार्य सुरू केले.

सदर  दोन्ही मुलींचे वय १५ वर्षांचे आतील असल्याने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अरविंद साळवे  यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना तात्काळ सदर गुन्हयाचा छडा लावण्या करीता सुचना दिल्या. वरिष्ठांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक खाडे यांनी तात्काळ स.पो.नि जितेंद्र बोबडे, पो.उपनि. संदीप कापडे, सचिन गदादे, अतूल कावळे यांचे नेतृत्वात चार पथक तयार करून शोध मोहिम सुरू केली. पथकाने घटनास्थळावर जावून गुन्हयाची सखोल माहिती गोळा केली. मिळालेल्या माहितीवरून सदर मुलींच्या संपर्कात यवतमाळ जिल्हयातील राळेगांव येथील काही मुले असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यावरून स्था.गु.शा.चंद्रपरची तिन पथके तात्काळ राळेगांव येथे तपास कामी रवाना झाले. त्या ठिकाणी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पो.स्टे.बाबुळगांव जि.यवतमाळ हद्दीतील एक मुलगी अज्ञात इसमाव्दारे अपहरण केल्या बाबत दि. २७/०९/२०२१ रोजी अप.क्र. ४१७/२०२१ कलम ३६३ भा.द.वी. अन्वये नोंद असल्याचे समजले.

पो.स्टे.वरोरा हद्दीतील व पो.स्टे.बाबुळगांव जि.यवतमाळ हद्दीतील मुलींचे एकाच वेळी घडलेल्या अपहरण झाल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यामुळे दोन्ही ठिकाणच्या घटनेमागे एखादी टोळी असल्याचा संशय आल्याने त्यादृष्टीने तपासाची चक्रे फिरविण्यात आली. पथकातील अधिकाऱ्यांनी अधिकची माहिती घेतली असता दि.२९/०९/२०२१ रोजी रेल्वे स्टेशन वर्धा जंक्शन येथे दिसून आल्या बाबत माहिती प्राप्त झाली. त्या बाबत अधिक माहिती घेतली असता, वरील नमुद गुन्हयातील पिडीत मुली व त्यांना घेवून जाणारे मुले हे रांजनगांव जि.पुणे येथे असल्याचे माहिती प्राप्त झाली. त्यावरून तात्काळ मा.पोलीस अधीक्षक सा. व पो नि, सा, स्था गु.शा, चंद्रपूर यांना माहिती देवून त्यांचे मार्गदर्शनाखाली पुणे करीता पथक रवाना झाले, तात्काळ पुणे पोलीसांना सुद्धा वरीष्ठ अधिकारी यांचे मार्फतीने माहिती देवून त्यांचे मदतीने सापळा रचून  कार्यवाही केली असता. नमुद गुन्हयातील तीन  अपहरण झालेल्या अल्पवयीन मुली व त्यांचे सोबत ४ संशयीत मुले नामे  रोहीत गोपाल संगीले (२० ) शुभम संजय मानेकर (२२) प्रमोद मोतीबाबा सोनवने (२२) प्रक्षिक विलास भोयर (२३ ) सर्व रा.राळेगांव जि.यवतमाळ हे सापडून आल्याने सर्वांना ताब्यात घेवून चंद्रपूर येथे आणण्यात आले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

सदरची यशस्वी कामगीरी अरविंद साळवे पोलीस अधीक्षक चंद्रपुर , अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कालकर्णी यांचे मार्गदर्शनात पो.नि. बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखा, स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे स.पो.नि जितेंद्र बोबडे, पो.उपनि. संदीप कापडे, सचिन गदादे, अतूल कावळे, पो.स्टॉफ पो.हवा.धनराज करकाडे, स्वामीदास चालेकर, ना.पो. शिगजानन नागरे, पो.शि.प्रशांत नागोसे, संदीप मुळे, चा.ना.पो शि दिनेश अराडे यांनी केली.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...