शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
जिल्ह्याबाहेरील चार मृत्युसह आज एकूण 20 मृत्यु
वणी: जिल्ह्यात गत 24 तासात 1163 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून 1011 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 20 मृत्यु झाले. यातील 11 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, पाच मृत्यु डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये तर चार मृत्यु खाजगी रुग्णालयात झाले. शनिवारी झालेल्या एकूण 20 मृत्युपैकी चार मृत्यु जिल्ह्याबाहेरील आहे. जि.प.आरोग्य विभागाच्यातर्फे प्राप्त अहवालानुसार शनिवारी एकूण 6042 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 1163 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4879 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5972 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2858 तर गृह विलगीकरणात 3114 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 46704 झाली आहे. 24 तासात 1011 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 39659 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1073 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.27 असून मृत्युदर 2.30 आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 66, 70, 49 वर्षीय पुरुष आणि 80, 83 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 45 वर्षीय पुरुष, आर्णि येथील 80 वर्षीय पुरुष, कळंब तालुक्यातील 68 वर्षीय महिला, बाभुळगाव तालुक्यातील 85 वर्षीय पुरुष, हिंगणघाट (जि. वर्धा) येथील 60 वर्षीय पुरुष, माहूर (जि. नांदेड) येथील 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यातील डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर मध्ये मृत्यु झालेल्यांमध्ये पांढरकवडा येथील 30, 60 वर्षीय पुरुष व 40 वर्षीय महिला, दारव्हा येथील 75 वर्षीय पुरुष आणि उमरखेड येथील 85 वर्षीय पुरुष तर खाजगी रुग्णालयात मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 49 वर्षीय पुरुष, उमरखेड येथील 52 वर्षीय पुरुष, नांदेड येथील 62 वर्षीय महिला आणि नागपूर येथील 46 वर्षीय पुरुष आहे.
शनिवारी पॉझेटिव्ह आलेल्या 1163 जणांमध्ये 653 पुरुष आणि 510 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 371 पॉझेटिव्ह रुग्ण, दिग्रस 163, वणी 147, उमरखेड 90, पांढरकवडा 67, झरी 49, दारव्हा 45, घाटंजी 45, मारेगाव 40, बाभुळगाव 36, महागाव 23, नेर 22, आर्णि 20, कळंब 16, पुसद 12, राळेगाव 8 आणि इतर शहरातील 9 रुग्ण असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...