Home / महाराष्ट्र / ये आझादी झुटी, दुःखी...

महाराष्ट्र

ये आझादी झुटी, दुःखी जनता भारत देशाची..!

ये आझादी झुटी, दुःखी जनता भारत देशाची..!

खरच हे भारताचे स्वतंत्र आहेत काय ?

गोऱ्या इंग्रजांच्या जुलमी गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी सुरू झालेल्या १८५७ च्या लढ्यानंतर तब्बल नव्वद वर्षांनी आपल्याला स्वतंत्र मिळाले.आज आपण ज्या स्वातंत्र्यात अहो त्याला आज ७४ वर्षे झालेली आहेत. कधी न मावळावा असा गोऱ्या इंग्रजी सत्तेचा सूर्य भारताच्या आकाशातून मावळला तोही कायमचाच. इंग्रजांची जुलमी राजवट संपून आता सत्ता स्वकीयांच्या हाती आली होती. पण खर पाहता खरच आज आपण स्वातंत्र्यात अहो काय? ज्या स्वातंत्र्यासाठी भारतमातेच्या वीरपुत्रांनी बलिदान दिली, आपल्या काया झिजविल्यात त्या सर्वांचे बलिदान आज कुठं तरी व्यर्थ झाले असे मला वाटते.

लेखन : शिवश्री. नयन मडावी (७०५७९५०६१२)

गोर-गरिबांना, मध्यमवर्गीय साध्यासुध्या माणसांना, सज्जनांना पोलिसांचीच भीती वाटावी. जिथे प्रामाणिकपणा हीच उपेक्षित होण्याची, छळले जाण्याची गुणवत्ता असते. भ्रष्टाचार हाच जिथे शिष्टाचार असावा. (आहे), जगणे हीच जिथे जन्मठेप वाटावी अशा व्यवस्थेला स्वातंत्र्य म्हणावे का ?

७४ वर्षे झालीत पण अजूनही तोच लढा सुरू आहे, आजची परिस्थिती लक्षात घेता कुठे दिसते समानता? कुठे गेलं आमचं स्वतंत्र? देशातच देशाचे दलाल निर्माण झाले देश विकाया काढला हारामखोरांनी जसे की हा भारत देश यांच्या बापजाद्यानची जागिर असावी.

स्वतंत्र भारताच्या शेतकऱ्यांची दैनिय अवस्था

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराजां सारख्या राज्यांनी आपल्या राजेशाहित लोकशाहीला लाजवेल असे कृषिविशेयक कायदे घेतलेत, अरे जागच्या जागी शेतकऱ्यांच्या कर्जमाफ्या देणारे या राज्यांचा आदर्श मानून त्यांचे नाव घेऊन सत्तेत आलेले आजच्या लोकशाहीतील नेते सत्तेत येताच आपले माजल्याचे गुण दाखवितात, "एखादी अभिनेता, नेता मरण पावला तर अक्खा च्या अक्खा मीडिया सर्व त्याच्या मागे धावतो,10 दिवस सर्वत्र त्याचीच चर्चा असते, पण आमचा कास्तकार/शेतकरी आत्महत्या करते त्याला कोणी हुंगुण सुद्धा पाहत नाही. ज्या देशात शेतकऱ्यांच्या सैवेधणीक आंदोनला दलपण्यासाठी देशाचा पंतप्रधान कोणती कसर सोडत नाही खरच हा देश स्वतंत्र असावा काय? आंदोलन करणाऱ्या जगाच्या पोशिंद्यावर कडाकत्या थंडीत सकाळी सकाळी थंड पाणी फेकल्या जाते, खरच त्या देशात लोकतंत्र असावं के? "शेतकरी मरो पण नेते,पुढारी जगलेच पाहिजे.."

भारतीय तिरंगी ध्वजाचा मान-अवमान

दरवर्षी राष्ट्रीय सणांच्या दिनी आपला तिरंगी ध्वज ऐटीत लाल किल्ल्यावर फडफड करीत आपले शौर्य दाखवीत असतो, पण २६ जानेवारी २०२१ रोजी शेतकरी आंदोलन सुरू असतांना शेतकऱ्यांनी तिरंग्याच्या अस्मितेला जराही ठेच न पोहचवता त्याच्या २५-३० फूट खाली आपला शेतकरी संघटनेचे ध्वज उभारला तर आमच्या तिरंग्याच्या अवमान होतो, आणि ज्या वेळी त्याच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिरंगी ध्वजाच्या स्वरूपीय गमच्याने आपले नाक पुसतो, घाम पुसतो तेव्हा तो गर्व आजमावत असावा.

ताज्या बातम्या

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...