आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (वणी विभागीय प्रतिनिधी) : मारेगाव शहरातील वणी रोडवरील ए वाय हे देशी दारूचे दुकान चोरट्यांनी फोडले. बुधवारी रात्री ही घटना घडल्याचे निष्पन्न झाले. या चोरीत १ लक्ष ९० हजारांची रोख रक्कम व ३५ ते ४० हजारांचे संबधित दुकानाचे साहित्य असे एकूण सुमारे सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. याबाबत दुकानाच्या कर्मचाऱ्यातर्फे अज्ञात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.
सदर तक्रारीनुसार, मारेगाव येथे वणी रोडवर अक्षरा बार च्या मागे ए वाय नावाची देशी दारु भट्टी आहे. सदर दुकान हे यवतमाळ येथील आरती योगेश जयस्वाल यांच्या मालकीचे असून सर्व व्यवहार त्यांचे नातेवाईक निलेश जयस्वाल पाहतात. त्यांच्या दुकानात संतोष मनोहरलाल जयस्वाल (वय ३४) रा. चिखलगाव ता. वणी हा काम करतो. संतोष दररोजचा दारू विक्रीचा गल्ला जमा करून तीन चार दिवसांनी ती रक्कम निलेश जयस्वाल यांच्या अधिकोष खात्यावर जमा करतो.
बुधवारी दिनांक ३० जून रोजी निलेश जयस्वाल यांनी संतोषला दारूच्या विक्रीतून आलेल्या रक्कमेतील १ लक्ष ३० हजार रू दुकानाच्या नुतनीकरणासाठी काढून ठेवण्यास सांगितले होते.त्यानुसार संतोषने दारूविक्रीतून आलेले ६० हजार रुपये व दुकान नुतनीकरणासाठी १ लक्ष ३० हजार रुपये असे एकूण १ लक्ष ९० हजार रुपये दुकानाच्या कॅश काऊंटमध्ये ठेवले. दुपारी ४ वाजता दुकान बंद करून तो चिखलगाव येथील त्याच्या घरी गेला. सकाळी संतोष दुकान उघडण्यासाठी गेला असता त्याला संपूर्ण दुकान फोडलेले आढळून आले. दुकानाच्या टीना व शेड चोरट्यांनी पळविल्या होत्या. त्याने आत जाऊन बघितले असता दुकानाच्या कॅश कोउंटर मध्ये ठेवलेले १ लक्ष ९० हजार रुपयेही चोरट्यांनी लंपास केलेले आढळून आले. या चोरीत चोरट्यांनी १ लक्ष ९० हजार रोख रक्कम , टीना व शेडचे अँगल ज्यांची किंमत ३५ हजार रुपये असा एकूण सुमारे २ लक्ष २५ हजार ३०० रुपयाचा मुद्देमाल लंपास केला. संतोषने तातडीने पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भांदवीच्या कलम ३८०, ४५७,४६१ नुसार गुन्हा दाखल केला. सदर प्रकरणाचा तपास ठाणेदार जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल चौधरी करीत आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...