Home / महाराष्ट्र / जिल्ह्यात दुसर्‍यांदा...

महाराष्ट्र

जिल्ह्यात दुसर्‍यांदा लॉकडाउन होणार..? चर्चांना ऊत, सर्वसामान्य नागरिक काळजीत..

जिल्ह्यात दुसर्‍यांदा लॉकडाउन होणार..? चर्चांना ऊत, सर्वसामान्य नागरिक काळजीत..

भारतीय वार्ता(प्रतिनिधी) दि. 24 :  यवतमाळ  जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा एकदा हात, पाय पसरायला सुरुवात केली असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने रात्री 6 ते सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान जिल्ह्यात पुन्हा एकदा  संचारबंदी लागू केल्यामुळे नवनवीन चर्चांना  ऊत आला आहे. रुग्णांची वाढती संख्या, प्रशासनाने रात्रीच्या वेळी लागू केलेली संचारबंदी यामुळे सलग तिसर्‍यांदा लॉकडाउन होतो की काय अशी भीती  नागरिकांमधून व्यक्त होऊ लागली आहे. पहिल्या लॉकडाउनमधून अद्याप सावरले नसतानाच दुसर्‍या लॉकडाउनच्या चर्चांच्या भीतीने अनेकांच्या अंगावर काटे उभे राहात आहेत.

 

मार्च 2020 मध्ये अखेरच्या आठवड्यात कोरोनाने जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर शिरकाव केला. जिल्हा रुग्णालयात अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी तीन विलगीकरण कक्ष निर्माण करण्यात आले होते.  अल्पावधीतच कोरोनाने आपला फास चांगला आवळायला सुरुवात केल्यामुळे रुग्णालयातील जवळपास सर्वच वॉर्ड कोरोना संशयित आणि बाधित व्यक्तींसाठी राखीव ठेवत त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात जिल्हा प्रशासनाने दिवसरात्र कडक संचारबंदी लागू केली होती. रस्त्यावर ठिकठिकाणी बॅरिकेटस् उभारून अडथळे निर्माण करण्यात आले होते. सर्व प्रकारची दुकाने, हॉटेल, वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. प्रारंभीच्या काळात केवळ अत्यावश्यक बाबी म्हणून मेडिकल, दूध आणि भाजीपाला विक्रीला परवानगी देण्यात आली होती.

 यवतमाळ  जिल्ह्यात कोरानामुळे प्रथमच येवडा प्रदीर्घ काळ संचारबंदी लागू करण्यात आली होती. रस्त्यावर पोलीस आणि रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी सक्षमपणे परिस्थिती हाताळत होते. जूनमध्ये परस्थिती पूर्वपदावर येऊ लागल्याचे चिन्ह निर्माण झाल्यनंतर टप्पाटप्याने भाजी मंडई, कपड्यासह अन्ये दुकानें हॉटेल, वाहतूक जिल्हाप्रश्नानाने सुरु केले मात्र 144 कलम लागू केले होते. यात्रा,  जत्रा, विवाह समारंभ याना परवानगी नाकारली होती.कालांतराने विवाह समारंभांना काही नियम व अटी घालून परवानगी देण्यात आली. कोरोना मुळे अनेकांचे व्यवसाय लयाला गेले अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर शेकडो नागरिक रस्त्यावर आले परिस्तिथीती पूर्वपदावर येत असताना कोरोनाने पुन्हा एकदा बाधित व्यक्ती मोठया प्रमाणात सापडू लागल्या आहेत. मास्कचा वापर करा असे वारंवार आव्हान करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. पोलिसांनी गेल्या दोन दिवसापासून मास्क न वापरणाऱ्यावर व वाहनचालकावर दंडात्मक कारवाई केली. सोमवारी  रात्री 5ते सकाळी 8पर्यंत संचारबंदी जाहीर केल्याने जिल्ह्यात दुसऱ्या लॉकडाऊनच्या चर्चेला उत आला आहे. सर्व सामान्य नागरिकांनी या  चर्चेचा  धसका घेतला आहे.

ताज्या बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...