Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्घुस येथे आठवडी...

चंद्रपूर - जिल्हा

घुग्घुस येथे आठवडी बाजारासाठी न.प.ची पार्किंग नाही..!

घुग्घुस येथे आठवडी बाजारासाठी न.प.ची पार्किंग नाही..!

पार्किंग काँग्रेसची, सफाई कर्मचारी नगर परिषदेचे.

देवानंद ठाकरे (घुग्घुस प्रतिनिधि ): घुग्घुस शहरात दर रविवारी मोठा आठवडी बाजार भरतो. घुग्घुस हे औद्योगिक शहर असल्याने लोकसंख्या ही 40 ते 50 हजाराच्या जवळपास आहे.  घुग्घुस शहराच्या मध्यभागी असलेल्या नगर परिषद कार्यालया पासून ते एसीसी सिमेंट कंपनी कडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत रविवारचा आठवडी बाजार मोठ्याप्रमाणात भरतो.
घुग्घुस परिसरातील 15 ते 16 ग्रामीण भागाच्या गावातील नागरिक रविवारच्या आठवडी बाजारात बाजार करण्यासाठी येतात. नकोडा, कैलास नगर, मुंगोली साखरा, पांढरकवडा, शेणगाव, सोनेगाव, अंतूर्ला, नागाडा, धानोरा, पिपरी, उसगाव, मुरसा, साखरवाही, बेलोरा, नायगाव, पुनवट अश्या अनेक खेड्यातील नागरिक बाजार करण्यासाठी घुग्घुस येथील आठवडी बाजारात येतात तसेच भाजीपाला विकण्यासाठी विक्रेते येतात त्यामुळे या बाजारात मोठी गर्दी उसळते. नागरिक दुचाकी व चारचाकी  वाहनाने बाजार करण्यासाठी कुटुंबासह येतात परंतु वाहन पार्किंग साठी कोणतीही सुविधा घुग्घुस नगर परिषदेतर्फे आता पर्यंत करण्यात आली नसल्याने वाहन धारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 

 घुग्घुस ते एसीसी सिमेंट कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यावरच दुचाकी लावून नागरिक बाजार करण्यासाठी जातात त्यामुळे सकाळ पासूनच या रस्त्यावर वाहने उभी असतात तर दुपारी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात व वाहतूक विस्कळीत होते. याच मार्गाने एसीसी सिमेंट कंपनीचे मोठे बल्कर टँकर ये-जा करतात त्यामुळे या रस्त्यावर मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

घुग्घुस नगर परिषदेची निर्मिती होऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. परंतु नगर परिषदेने आता पर्यंत आठवडी बाजारासाठी पार्किंग बनविली नाही व या रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी कोणतीही उपाय योजना केली नाही.  त्यामुळे आठवडी बाजारातील वाहनांच्या पार्किंगची समस्या जैसे थे आहे.

यापूर्वी घुग्घुस यंग चांदा ब्रिगेडचे नेते स्वप्नील वाढई यांनी घुग्घुस नपला निवेदन देऊन आठवडी बाजाराच्या गाड्या उभ्या करण्याकरिता पार्किंग बनवून देण्याची मागणी केली होती परंतु आता पर्यंत घुग्घुस नपने पार्किंग बनवून दिली नाही.घुग्घुस शहर काँग्रेसच्या एका नेत्याने घुग्घुस नगर परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर श्रेय घेण्यासाठी बाजारा जवळ रविवार 19 डिसेंबर रोजी पार्किंग बनविली काँग्रेसच्या पार्किंग मध्ये घुग्घुस नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांतर्फे साफसफाई करण्यात आली आहे. घुग्घुस नपची शासकीय पार्किंग कधी बनणार असा संतप्त सवाल यावेळी घुग्घुस यंग चांदा ब्रिगेडचे नेते स्वप्नील वाढई यांनी यावेळी उपस्थित केला.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...