Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / आदिवासी समाजामध्ये...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

आदिवासी समाजामध्ये परिवर्तनाची उर्मी असून समाजात विचार परिवर्तन काळाची गरज आहे

आदिवासी समाजामध्ये परिवर्तनाची उर्मी असून समाजात विचार परिवर्तन काळाची गरज आहे

आदिवासी समाजामध्ये परिवर्तनाची उर्मी असून समाजात विचार परिवर्तन काळाची गरज आहे

प्रविन गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): शौर्य आणि पराक्रमाची राणी दुर्गावती यांची ४९७ वी जयंती दिं ५ ऑक्टोबर २०२१ रोज मंगळवारला वाऱ्हा येथे साजरी करण्यात आली.  राणी दुर्गावती  जयंती निमित्य  कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळकृष्ण गेडाम बोलतांना म्हणाले की दिवसेंदिवस आदिवासी समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय-अत्याचार होत असून आदिवासी समाजाच्या नावावर मोठमोठ्या नोकऱ्या सुद्धा बळकावलेल्या आहेत.

त्यासाठी गोंड परधान कोलाम आदी समाजाने एकत्रित येऊन या होणाऱ्या अन्याय विरुद्ध आपण लढा दिला पाहिजे कारण आदिवासी समाज हा परिवर्तनाच्या मार्गावर आलेला आहे आदिवासी समाजामध्ये परिवर्तनाची ऊर्मी असून समाजात विचार परिवर्तन करणे काळाची गरज आहे असे  मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक बळवंत मडावी यांनी आदिवासी समाजाने राजकीय दबाव निर्माण केला पाहिजे असे वक्तव्य यावेळी केले तसेच प्रमुख अतिथी म्हणून दिलीप शेडमाके यांनी पुढे होणाऱ्या जनगणनेतील धार्मिक कॉलममध्ये आदिवासींनी गोंडीधर्म लिहावा असा संदेश आदिवासी बांधवांना दिला आहे.

तसेच प्रास्ताविक करताना विलास मेश्राम यांनी राणी दुर्गावती त्यांच्याकडे असलेल्या साहस दूरदृष्टी शौर्य यांच्या जोरावर मुघल सत्तेविरुद्ध लढा दिला व एक उत्कृष्ट प्रशासक म्हणून नावारुपास आले म्हणजे आदिवासी समाज हा पूर्वीपासूनच राज्यकर्ती जमात आहे परंतु काही कारणाने ही परिस्थिती बदलली आहे ती पुन्हा प्राप्त करण्यासाठी सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन राजकीय सत्ता प्राप्त केल्या शिवाय समाजाची प्रगती होणार नाही कारण जे समाजाचे लोक आता आमदार - खासदार आहेत ते कोणत्यातरी पक्षाचे आहे यांना पक्षाच्या अजेंडा नुसार काम करावे लागते त्यामुळे हक्काच्या पक्षाला मतदान करा व पूर्वीची राजेशाही समाज निर्माण केला तर राणी दुर्गावती यांचे बलिदान सार्थकी लागेल असे मत  प्रास्ताविकातून व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाला उपस्थित दिलीप शेडमाके  जिल्हाध्यक्ष गो .ग .पा, दिलीप शेडमाके, विधानसभा अध्यक्ष जाम नरेंद्र किनाके, जिल्हा सचिव व गो.ग.प मंगेश कोकाटे वणी, विधानसभा अध्यक्ष, कमलाताई उईके रुढा, विलास मेश्राम वणी, रजनीकांत परचाके राळेगाव, विजय ताई रोहणकर कळंब, गजानन येरकाडे कळंब,  नीताताई कुळसंगे उंदरी, नरेश तुमराम बाभुळगाव, अरुण टेकाम वणी, रामभाऊ पेंदोर झरीजामणी, अंकुश आत्राम केळापूर, भीमराव पुरके मोहदा, किसन पुसनाके यवतमाळ, भावनाताई रेवडी पोलीस पाटील वाऱ्हा, लताताई घोटेकर सरपंच वाऱ्हा, रामभाऊ कोवे माजी सैनिक राळेगाव, कविताताई किनाके सरपंच आमला, सोनूताई तोडासे सरपंच आष्टा,हरीश किनाके राळेगाव, प्रभाकर कोकांडे यवतमाळ, हरिदास धुर्वे राळेगाव, दत्ताची घोटेकर तंटामुक्त अध्यक्ष वाऱ्हा,नानाजी कोवे वालधुर, अशोक कुमरे राळेगाव, नितिन मडावी, गजानन तुमराम,इत्यादी आदिवासी मान्यवर यावेळी उपस्थित होते  या कार्यक्रमाचे सूत्र संचालन राजू वाढवे, तर आभार प्रदर्शन विठ्ठल धुर्वे, यांनी केले यावेळी  कार्यक्रमाला गावातील आदिवासी समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...