शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
हिंगोलीत आज झाले अंत्यसंस्कार
पुणे (प्रतिनिधी)दि. 16: काँग्रेसचे तरुण नेतृत्व आणि खा. राजीव सातव काल पहाटे जहांगीर रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते 46 वर्षांचे होते. सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी हिंगोलीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यांचे पार्थिव आज सायंकाळी पुण्याहून हिंगोलीत आणले जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी दिली.
महाराष्ट्रासह दिल्लीतील काँग्रेस पक्षश्रेष्ठीला रविवारी पहाटे धक्का देणारी ही घटना घडली. राजीव सातव यांनी कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली होती. मात्र, फुफ्फुसात संसर्ग झाल्याने त्यांची प्रकृती बिघडली होती. पुण्यातील जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. 23 दिवसांपासून उपचार सुरू असलेल्या सातव यांची प्रकृती मध्यंतरी बिघडली होती. नंतर त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली होती. तसे वृत्तवाहिन्यावर कोरोनातून सावरले असे सांगल्या गेले असताना राजीव सातव यांच्या निधनाची वार्ता वार्यासारखी देशभरात पसरली. त्यांच्या निधनावर शोक व्यक्त होत असल्याची माहिती काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी दिली. राजीव सातव यांना 19 एप्रिलपासून अस्वस्थ वाटत होते. कोविडची लक्षणे दिसत असल्याने त्यांनी 21 एप्रिल रोजी कोरोना चाचणी केली होती. 22 एप्रिल रोजी चाचणी अहवाल समोर आल्यानंतर त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. अहवाल आल्यानंतर दुसर्या दिवशी म्हणजे 23 एप्रिल रोजी सातव यांना पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला त्यांची प्रकृती चांगली होती. मात्र, 25 एप्रिलनंतर प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात अर्थात आयसीयू वार्डात हलवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना मुंबई हलवण्याची चर्चाही सुरू झाली होती. मात्र, त्यांच्या प्रकृतीत पुन्हा सुधारणा होऊ लागली होती. सातव यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र, त्यांना कोरोना उपचारादरम्यान सायटोमॅजिलो विषाणूचा संसर्ग झाला होता.
दरम्यान, शनिवारी (15 मे) काँग्रेसचे नेते व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी रुग्णालयात जाऊन सातव यांच्यावर उपचार करणार्या डॉक्टरांची भेट घेत विचारपूस केली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ‘राजीव सातव यांना काल रात्र थोडा त्रास जाणवला, मात्र ते लवकरच बरे होतील,’ असे म्हटले होते. मात्र, त्यानंतर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करून राजीव सातव यांचे निधन झाल्याची माहिती दिली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक असलेल्या राजीव सातव यांच्या निधनाबद्दल सुरजेवाला यांनी दुःख व्यक्त केले आहे. निःशब्द! आज मी असा सहकारी गमावला आहे, ज्याने सार्वजनिक जीवनातील पहिले पाऊल माझ्यासोबत युवक काँग्रेसमध्ये ठेवले होते आणि आजपर्यंत माझ्यासोबत चालत होते. राजीव सातव यांचा साधेपणा, त्यांचे हास्य, जमिनीशी असलेली नाळ, नेतृत्वाशी आणि पक्षासोबत असलेली निष्ठा व मैत्री नेहमीच आठवत राहील. माझ्या मित्रा अलविदा, जिथेही राहशील, झळाळत रहा, अशा शोकभावना सुरजेवाला यांनी व्यक्त केल्या आहेत.
सलग 4 वेळा मिळाला संसदरत्न सन्मान
खा. राजीव सातव यांनी संसदेत वेळोवेळी विविध प्रश्नांवर आवाज उठवला. संसदेत त्यांनी 1,075 प्रश्न विचारले होते तसेच त्यांनी 205 वादविवादांमध्ये सहभाग घेतला होता. संसदेत त्यांनी 81 टक्के उपस्थिती दाखवली होती. या कार्याचा गौरव म्हणून त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्कार मिळाला होता.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...