भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
Reg No. MH-36-0010493
पोलीस अधीक्षकांच्या पुढाकाराने अनेक ठिकाणी कार्यशाळा
वणी: पोलिसांच्या सततच्या कामामुळे त्यांच्यावर कामाचा तणाव असतो. ध्यान धारणेमुळे पोलिसांच्या मनावरील ताणतणाव कमी होण्यास मदत होते. त्यांची कार्यक्षमता वाढू शकते. जिल्ह्यातील पोलिसांचे शारीरिक स्वास्थ्या बरोबर मानसिक स्वास्थ्य पूर्णपणे सुदृढ राहावे. पोलिसांना पूर्ण कार्यक्षमतेने काम करता यावे यासाठी जिल्ह्यात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी केले. यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या वतीने संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या संकल्पनेतून दि.1 ते 4 फेब्रुवारी दरम्याम जिल्ह्यात शारीरिक व मानसिक स्वास्थ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शारीरिक व मानसिक स्वास्थ शिबिराचे उद्घाटन आज दि. 1 फेब्रुवारीला वणी येथे सकाळी 7 वाजता सिद्धी विनायक मंगल कार्यालयात जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांच्या हस्ते झाले. या उद्घाटन कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, येथील ठाणेदार वैभव जाधव, मारेगाव येथील ठाणेदार जगदीश मंडलवार, पोलीस निरीक्षक मनोज केदारे उपस्थित होते. सर्व प्रथम ठाणेदार वैभव जाधव यांनी पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांचे स्वागत केले. या शिबिराला प्रमुख मार्गदर्शन म्हणून अमरावती येथील प्रा. डॉ. शिवाजी कुचे उपस्थित होते.
पोलिसांचे जीवन हे तणावात असते. त्याच बरोबर त्यांचे कुटुंबीय सुद्धा तणावात असतात. या तणावातून मुक्तता मिळावी त्याच प्रमाणे कोरोना काळात पोलीस हे 24 तास कर्तव्यावर होते अनेक पोलीस बांधवाना कोरोनाची लागण झाली व अनेक पोलीस बांधवांचा कोरोनाने मृत्यू देखील झाले. अशा परिस्थितीत सुद्ध पोलीस बांधवांनी आपले कर्तव्य पार पाडले. आपल्या कुटुंबाचा विचार न करता पोलीस कर्तव्यावर होते. त्यामुळे पोलिसांचे व त्यांच्या कुटुंबाचे ताण कमी व्हावे या करीता पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या संकल्पनेतून संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात हे शिबीर चार दिवस राबविण्यात येणार आहे. प्रा. डॉ. शिवाजी कुचे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात पोलिसांसाठी कोरोना काळात शिबीर घेवून पोलिसाना मार्गदर्शन केले होते. यावेळी पोलीस अधीक्षक मा.डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी प्रा.डॉ शिवाजी कुचे यांचे अभिनंदन केले.
सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांनी केले तर आभार प्रदर्शन ठाणेदार वैभव जाधव यांनी केले. या शिबिरात वणी उपविभागातील 100 पोलीस अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते.सर्व अधिकारी, अंमलदार यांचे शारीरिक मानसिक अध्यात्मिक क्षमता विकसित व्हावी. प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक, व्यावसायिक आयुष्यात सुसंवाद निर्माण व्हावा या उद्देशाने प्रा.डॉ. शिवाजी कुचे यांचे जिल्ह्यात 16 शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या संधीचा लाभ यवतमाळ जिल्ह्यातील सर्व अधिकारी, अंमलदार व कुटुंबीयांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी केले आहे.
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...
*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...