Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / बोरी(गदाजी) येथे घडला...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

बोरी(गदाजी) येथे घडला थरार..! इसमावर चाकू हल्ला करुन आरोपी झाला होता फरार.

बोरी(गदाजी) येथे घडला थरार..!  इसमावर चाकू हल्ला करुन आरोपी झाला होता फरार.

इसम गंभीर जखमी, आरोपीवर गुन्हा दाखल. मारेगाव पोलिसांना आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश..

आशिष साबरे (वणी-विभागीय-प्रतिनिधी) :- एका ४५ वर्षीय इसमावर धारदार चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची थरारक घटना मारेगाव तालुक्यातील बोरी (गदाजी) येथे २३ जुलै च्या रात्री ९.०० वाजताच्या दरम्यान घडली. विशाल पंजाब उईके (२७) रा.बोरी(गदाजी) असे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.तर सोनबा कोरझरे (४५) रा.बोरी (गदाजी) असे चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे.पोलीस सूत्राच्या माहिती नुसार जखमी सोनबा व मुलगा अंकुश कोरझरे (२३), मंगल कोरझरे (१५) हे घटनेच्या दिवशी प्रभाकर नामक इसमाला दापोरा येथे सोडुन देऊन गावात परत आले.दरम्यान गावातील पान ठेल्यावर खर्रा घेऊन घरी परत जात असताना गदाजी महाराज देवस्थान च्या गेट जवळ आरोपीचा भाऊ मंगेश सोबत सोनबा बोलत असतांना,आरोपी विशाल उईके हा मागुन आला व हातात असलेल्या धारदार चाकूने हल्ला चढविला.यात सोंनबाच्या पोटाच्या वर धारदार चाकूने आरोपीने भोकसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी होवून तो खाली पडला.दरम्यान आरडाओरडा केला असता आरोपी विशाल हा घटनास्थळा वरून फरार झाला.दरम्यान जखमी सोनबा ला मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता, प्रकृती चिंताजनक असल्याने यवतमाळ येथे हलविण्यात आले.

फिर्यादी जखमीचा मुलगा अंकुश कोरझरे (२३) याच्या तक्रारीवरून आरोपी विशाल पंजाब उईके याचे वर कलम ३२६ अंतर्गत गुन्हा दाखल करून मध्यरात्री २ वाजता दरम्यान आरोपीस अटक करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांचे मार्गदर्शनात मारेगाव पोलीस करत आहे.व सरते शेवटी मारेगाव पोलीस आरोपीच्या मुसक्या आवळन्यात यश आले.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...