वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
घुग्गुस (प्रतिनिधी): राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हाती राज्याची तिजोरी होती म्हणूनच घुग्घुस शहराचा आणि चंद्रपूर जिल्ह्याचा कायापालट झाला. असे जोरदार प्रत्युत्तर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांना भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी दिला आहे.
भाजप सरकारच्या काळात मंजूर झालेल्या घुग्घुस ग्रामीण रुग्णालयाच्या भूमिपूजनाप्रसंगी बोलताना पालकमंत्री वडेट्टीवारांनी केलेल्या बिनबुडाच्या वक्तव्यावरून उपाध्यक्ष बोढे यांनी हे प्रत्युत्तर दिले आहे. तत्कालीन अर्थ व नियोजन मंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात विकासाची अभूतपूर्व मालिका सुरू केली, त्याचाच एक भाग म्हणजे घुग्घुस येथे मंजूर झालेले ग्रामीण रुग्णालय आणि स्थानिक पातळीवरील मोठमोठी विकासकामे आहेत.
भाजपाने मंजूर केलेल्या घुग्घुस येथील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेय विनाकारण काँग्रेसने घेऊ नये, घुग्घुसच्या सामान्य जनतेला माहित आहे की घुग्घुस शहरातील प्रत्येक विकासकामे ही फक्त भाजपानेच केली आहेत. घुग्घुस शहरात बसस्थानक, दहा बगीचे, सर्वत्र सिमेंटचे रस्ते, नाल्या, पिण्याच्या पाण्याच्या टाकी, हायमास्ट लाईट, आरो मशीन, एलईडी लाईट, सर्व समाजाच्या धार्मिक स्थळांचा विकास, सर्व समाजाच्या स्मशान भूमीचा विकास यासोबतच परवा घुग्घुसमधील ज्या ग्रामीण रुग्णालयाचे भूमिपूजन ना. विजय वडेट्टीवार यांनी केले ते ग्रामीण रुग्णालय सूद्धा भाजपाच्या काळात आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी मंजूर केलेले आहे. यात काँग्रेस पार्टीचे व त्यांच्या नेत्यांचे कोणतेही योगदान नाही.
त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी व मंत्र्यांनी असे फुकटचे श्रेय घेऊ नये. तसेच आमचे आव्हान आहे की, जर त्यांनी हे ग्रामीण रुग्णालय मंजूर केले असेल तर पुरावा द्यावा. या ग्रामीण रुग्णालयाला भाजपा सरकारच्या काळातच 2018 रोजी प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेली असून 2019 च्या अर्थसंकल्पात ग्रामीण रुग्णलयाच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. तसेच याचा नकाशा देखील तयार करण्यात आला होता. परंतु जेव्हा निविदा साठी गेले तेव्हा महाराष्ट्रातील जनतेशी बेईमानी करून महाराष्ट्राचा जनतेनी दिलेल्या जनादेशाचा अनादर करून सत्तेत आलेल्या विश्वासघाती महाविकास आघाडी सरकारने कोरोनाचे कारण देत ही निविदा काढली नाही. आणि आता निविदा काढून आम्हीच ग्रामीण रुग्णालय मंजूर केले असे म्हणवून श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. घुग्घुस येथील ग्रामीण रुग्णालयाच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलतांना ना. विजय वडेट्टीवार यांनी तिजोरी हातात असतांना रुग्णालय सोडून बसस्थानक बांधले असा टोला भाजपाला लगावाला होता, याचे जोरदार प्रत्युत्तर भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी ना. विजय वडेट्टीवारांना दिले आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...