आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
प्रविण गायकवाड(प्रतिनिधी): नवीन वर्षाच्या १७ जानेवारी २०२२ ला होणारी कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगांव ची निवडमूक सर्व राजकीय पक्षांचे अस्तित्व दाखविणारी "कौन कितने पानी में"है.म्हणजे च राजकीय पक्षांच्या नेत्यांसाठी प्रतिष्ठेची असणार आहे. गेल्या पंधरा वर्षापासून कृ.उ.बा.स राळेगांव सभापती व काँग्रेस पक्षाचे सहकार नेते ॲड. प्रफुल्लभाऊ मानकर विद्यमान सभापती यांच्या ताब्यात पूर्ण बहूमताने आहे हे विशेष. मागील निवडणूक "सर" आणि "भाऊ" स्वतंत्र होऊन एकमेकां विरोधात लढले होते. पण बहूमताने जास्त संचालक भाऊ चे निवडून आले होते. त्यानंतर सर आणि भाऊ एकत्र येऊन विधानसभे सह सर्व निवडणुका लढले.याचा मोठा फायदा मागील वेळी विद्यमान आमदारांना मिळालेली चाळीस हजार मतांची लीड,अवघ्या पाच वर्षांत नऊ हजार मताधिक्यावर,तर अनेक ग्रामपंचायती,सहकारी संस्थेवर मोठ्या प्रमाणावर काँग्रेस चे कार्यकर्ते निवडून येऊन भाजपा चा बराच सा प्रभाव कमी होण्यात झाला आहे.
यावेळी विद्यमान आमदारां सोबत जुनी जाणती पुर्वाश्रमी ची काँग्रेसची वजनदार मंडळी असल्याने,कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगांव च्या निवडणुकीत पूर्ण दमाने उतरेल यात शंका च नाही.आणि निवडणूकी साठी अत्यावश्यक बाबी केव्हा?कोठे?कशा?उपयोगात आणायच्या याचा चांगला च अभ्यास विद्यमान आमदारांनी या साडे सात वर्षांमध्ये केला आहे...पण एक महिन्या अगोदर भाऊ नी सर्वांना सोबत घेऊन केलेल्या थंड हवा सहल काय अघटित घडवते?
ते नामांकन दाखल करते वेळी दिसेल चं.यावेळी सुद्धा भाऊ चे नशीब जोरावर दिसत आहेत कारण सोसायटी चे जूनेच सभासद मतदान करणार असून,हमाल मापारी मधील मते,आणि ग्रामपंचायत सदस्य काँग्रेस पक्षाचे जास्त असल्याचा अलगद लाभ मिळणार आहे.याचा प्रत्यय भाऊंनी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत आपलेच वर्चस्व,सर्व विरोधात असून ही दाखवून दिले आहे हे विशेष..
कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगांव चे एक हजार चारशे हून अधिक मतदार आहे.या मध्ये सोसायटी मतदार संघात पाचशे अडूसष्ट,ग्रामपंचायत मतदार संघात पाचशे तर तेरा ग्रामपंचायतीवर प्रशासक,हमाल मापारी मतदार संघात एकशे एकसष्ट,व्यापारी अडते मतदार संघात एकशे एकोणसाठ मतदार आहेत.
भाजपा,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस,मनसे सह सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना कार्यकर्ता मंडळी ना सहकार क्षेत्रात पाय रोवण्याची नामी संधी आलेली असून,याचा कितपत फायदा हे उचलतात ते आगामी काळात दिसेल चं माजी शिक्षण मंत्री वसंतरावजी पुरके सर व सहकार नेते ॲड. प्रफुल्लभाऊ मानकर हे दोन्ही एकत्र असल्याने राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती व नगरपंचायत व पंचायत समिती जिल्हा परिषद काँग्रेस येणार काळा दगडावरची भगवी रेश अशी जनसामान्यात चर्चा सुरू आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...