खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी (प्रतिनिधी):- केवळ पुराण वाङ्मयच नव्हे तर भारतीय संस्कृतीशी संबंधित प्रत्येकच शास्त्र मेल्यानंतर स्वर्गात जाण्यासाठी नाहीतर जिवंतपणी सर्वांगीण सुख प्रदान करीत या आयुष्याला स्वर्ग बनवण्याचे मार्ग आहेत. मानवी जीवनाच्या सर्व अंगांना समृद्ध करण्याची क्षमता असणाऱ्या या ग्रंथात वैज्ञानिक भूमिकादेखील ठाई ठाई भरलेली आहे. मात्र ती भूमिका समजून घेण्यासाठी पुराणकारांची विशिष्ट कथात्मक शैली आणि त्यांची स्वतःची वैज्ञानिक परिभाषा आम्हाला समजून घ्यावी लागेल. पुराणातील विज्ञान हे मानवी जीवन समृद्धीसाठी आहे. असे प्रतिपादन विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांनी केले. ते विदर्भ साहित्य संघ व नगर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने ' माझा गाव माझा वक्ता' या व्याख्यानमालेचे पहीले पुष्प पुराण वाड्मयातील विज्ञान या विषयावर गुंफताना बोलत होते. अध्यक्षस्थानी नगर वाचनालयाचे अध्यक्ष माधव सरपटवार हे होते.
प्रास्ताविक करताना वि.सा. संघाचे उपाध्यक्ष गजानन कासावार यांनी यापूर्वी झालेल्या विविध व्याख्यानमालांचा परामर्श घेत या व्याख्यानमालेची भूमिका उलगडून दाखविली. आपला विषय मांडताना ते पुढे म्हणाले की, आज आम्ही आमच्या सोयीसाठी निर्माण केलेल्या परिभाषेत पाच हजार वर्षापूर्वी त्यांनी सांगायला पाहिजे ही अपेक्षाच निरर्थक आहे. आम्ही पुराणातील विज्ञान समजून घेण्यासाठी त्यातील परिभाषेचा अभ्यास केल्यास असंख्य थक्क करणाऱ्या गोष्टी आपल्याला पाहावयास मिळतील. पुराण वाङ्मयाचा यादृष्टीने सखोल अभ्यास झाल्यास आपला हा वारसा आपल्याला अधिकच अभिमानास्पद ठरेल. कोणत्याही वैज्ञानिक शाखेला त्यातील संशोधनाला, त्यांनी सादर केलेल्या सिद्धांतांना, नैतिक मूल्य, चारित्र्यनिर्मिती, भावनिक उन्नती, बौद्धिक समाधान, मन:शांती, भावनिक आधार अशा मूल्यांच्या आधारे आपण तपासत नाही मात्र या सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण असणाऱ्या पुराणांना आपण विज्ञानाचा कसोटी लावू पाहतो. याची खरंच आवश्यकता आहे का? असा प्रश्न विचारत, असा अभ्यास केला तर पुराण वाड्मय या दृष्टीने देखील परिपूर्ण आहे. अशी पार्श्वभूमी सांगत विद्यावाचस्पती स्वानंद पुंड यांनी विश्व निर्मितीची प्रक्रिया, संपूर्ण ब्रह्मांडाचा आधार असणारा धृव, पुराणातील ग्रहणांचे वर्णन, भारतीय क्रमविकास सिद्धांत, सापेक्षतावाद, क्लोनिंग सारखे आधुनिक शोध, प्राचीन भारतीय विमान विद्या, अस्त्र शृंखला आणि तिची विविध वैशिष्ट्ये, अहिल्या कथेतील कृषिविज्ञान, स्कंद जन्मकथेतील पारद विज्ञान, युवनाश्व कथेतील पुरुष गर्भधारणा विज्ञान अशा विविध गोष्टी सांगून त्यातील वैज्ञानिक निरूपण विविध श्लोकांच्या आधारे उलगडून दाखविले.
स्पिसीझ, ॲफिबिया, मॅमिलिया, प्रायमेटस् या क्रमविकासातील पायऱ्या आणि मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह हा दशावतारातील क्रम यातील त्यांनी उलगडून दाखविली सांगड ती पुराणांची परिभाषा कशी समजून घ्यायची याचे सर्वोत्तम उदाहरण होती. अध्यक्षीय समारोप करताना वणी नगरीच्या संपन्न साहित्यिक वारशाला पुढे चालवण्याच्या या भूमिकेचे माधवराव सरपटवार यांनी विशेष कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वि.सा. संघ सचिव डॉ. अभिजित अणे यांनी तर आभार प्रदर्शन अशोक सोनटक्के यांनी केले. देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे आणि राम मेंगावार यांनी यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...