वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
केवळ 338 कोटी रू देऊन धान उत्पादक शेतकऱ्यांची बोळवण
चंद्रपूर : खरीप पणन हंगाम 2020- 21 मधील धानानुसार धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रदान करावयाच्या प्रोत्साहनपर राशी अर्थात बोनसपोटी द्यावयाची उर्वरीत रक्कम त्वरित प्रदान करण्यात यावी अशी मागणी विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ . सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
खरीप पणन हंगाम 2020- 21 मधील धानानुसार धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रदान करावयाच्या प्रोत्साहनपर राशी अर्थात बोनस साठी तीनशे अडतीस कोटी रू रकमेला मंजुरी देण्यात आली असून दि. 1 जुलै रोजी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वित्तीय सल्लागारांतर्फे याबाबत शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. या बोनसपोटी सुमारे 800 कोटी रू रक्कम थकीत असताना केवळ 338 कोटी रू रक्कम प्रदान करून शासनाने शेतकऱ्यांची बोळवण केली असून उर्वरित रकमेसाठी धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.
राज्य सरकारने धान उत्पादक शेतक-यांना देण्यात येणाच्या बोनसची रक्कम पूर्णपणे प्रदान न केल्यामुळे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या चार जिल्हयातील धान उत्पादक शेतक-यांवर अन्याय होत आहे. सध्या शेतीची कामे सुरु झाली असुन बी-बीयाणे, खते व इतर शेतीविषयक साधने खरेदी करावयास व शेतीकामास शेतक-यांना पैश्यांची गरज असताना त्यांच्या हक्काचा बोनस थकीत असल्यामुळे धान उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे धान उत्पादक शेतक-यांना एप्रिल महिन्यामध्येच त्यांच्या हक्काचे बोनस मिळणे अपेक्षित होते. पण जुन महिन्याचा मध्य उलटून गेला असताना अद्याप बोनस मिळालेला नाही.
त्याच प्रमाणे शासनाद्वारे खरेदी करण्यात आलेल्या धानाचे पैसे सुद्धा ब-याच शेतक-यांना मिळालेले नाही. शासनाद्वारे बिजाई पुरवठा करण्यात येतो. तो देखील अनेक शेतक-यांना मिळालेला नाही आहे. त्यामुळे गरिब शेतक-यांना खाजगी दुकानातुन महागात बिजाई खरेदी करावी लागत आहे. यामुळे त्यांचे आर्थिक शोषण होत आहे. या बोनसपोटी शेतकऱ्यांचे 800 कोटी रू शासनाकडे थकीत आहे.
मात्र केवळ 338 कोटी रू प्रदान करून उर्वरित रकमेसाठी शेतकऱ्यांना पुन्हा संघर्ष करावा लागणार असल्याचे दिसत आहे. अशातच पुन्हा मुसळधार पावसाने शेतीला बसलेला फटका लक्षात घेता धान उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर घातली गेली आहे.
शासनाने खरीप पणन हंगाम 2020- 21 मधील धानानुसार धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रदान करावयाच्या प्रोत्साहनपर राशी अर्थात बोनसपोटी द्यावयाची उर्वरीत रक्कम त्वरित प्रदान करण्याची आवश्यकता असल्याचे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. पुन्हा एकदा या संदर्भात मुख्यमंत्री तसेच अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट आपण घेणार असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...