वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
Reg No. MH-36-0010493
ब्रम्हपुरी: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ब्रम्हपुरी नगर तर्फे अलिकडेच विजयादशमी उत्सवाचे आयोजन लोकमान्य टिळक विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले. याप्रसंगी मंचावर प्रमुख वक्ते श्री अरविंद कुकडे विदर्भ प्रांत सहसंपर्क प्रमुख , नागपूर , तद्वतच प्रमुख अतिथी म्हणून श्री चैतन्य मातुरकर कार्यकारी व्यवस्थापक एच.डी.एफ.सी. बँक ब्रम्हपुरी हे उपस्थित होते. त्याचप्रमाणे मंचावर श्री जयंतराव खरवडे चंद्रपूर विभागसंघचालक , श्री हरीदास दोनाडकर ब्रम्हपुरी तालुका कार्यवाह , श्री स्वप्निल माकोडे ब्रम्हपुरी नगर कार्यवाह प्रामुख्याने उपस्थित होते.
विजयादशमी उत्सव प्रसंगी नगरातील तरूण व व्यावसायिक स्वयंसेवकांनी योगासन , सामुहिक समता , नियुद्ध , व्यायामयोग इत्यादी शारीरीक प्रात्याक्षिक सादरीकरण केले. घोषदलाचे प्रात्याक्षिकासह बौद्धिक विभागाच्या सांघिक गीत , वैयक्तिक गीत , सुभाषित , अमृतवचन यांचे देखिल सादरीकरण करण्यात आले.
प्रमुख वक्ते अरविंद कुकडे यांनी आपल्या उद्बोधनातून विजयादशमी उत्सवाचे महत्व , कोविड काळातील संपूर्ण देशातील स्वयंसेवकांचे सेवाकार्य, अयोध्येतील राम मंदीर निर्माण अभियानाची यशस्विता इत्यादी विषयाचे समयोचित विवेचन केले. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी संघाच्या स्थापनेच्या शताब्दी वर्ष २०२५ पर्यंत समाजात जाऊन अतिशय नम्रतेने सेवाकार्य करण्याचे व सज्जन शक्तिंची मने जिंकून संतप्रवृत्तीच्या मंडळीचा आशिर्वाद प्राप्त करून आपल्या कार्याची गती वाढविण्याचे आवाहन केले.
प्रशासकीय दिशानिर्देशांचे पालन करून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने उत्सव साजरा करण्यात आला. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन ब्रम्हपुरी नगर कार्यवाह स्वप्निल माकोडे यांनी केले. उत्सवाच्या यशस्वितेसाठी नगरातील , जिल्ह्यातील पदाधिकारी तथा सर्व स्वयंसेवकांनी प्रयत्न केले.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...
ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...