Home / महाराष्ट्र / शेतकर्‍यांची 6 फेब्रुवारीला...

महाराष्ट्र

शेतकर्‍यांची 6 फेब्रुवारीला भारत बंदची हाक ..!भांडवलशाहीचे गुलाम होण्यापेक्षा स्वतःचे हक्कदार बना.. !

शेतकर्‍यांची 6 फेब्रुवारीला भारत बंदची हाक ..!भांडवलशाहीचे गुलाम होण्यापेक्षा स्वतःचे हक्कदार बना.. !

26 जानेवारीला झालेल्या हिंसे प्रकरणी याचिका फेटाळली. 
भारतीय वार्ता :  प्रजासत्ताक दिनी शेतकरी ट्रॅक्टर रॅली दरम्यान दिल्लीत झालेल्या हिंसाचाराची चौकशी निवृत्त न्यायाधीशांकडून करून घेण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. सरन्यायाधीश  एस. ए. बोबडे म्हणाले,  सरकार या प्रकरणात आपले काम करत आहेत. तपासात कोणतीही कमतरता नाही.  सरकारने त्याकडे फार गांभीर्याने पाहिले आहे. आम्ही पंतप्रधानांचे विधान देखील ऐकले आहे. ते म्हणाले, कायदा आपले काम करत आहे. सरकारला याचा तपास करू द्यावा. दरम्यान, शेतकर्‍यांनी 6 फेब्रुवारीला भारत बंदची हाक दिली आहे.
वकील विशाल तिवारी यांनी दिल्लीतील हिंसाचाराच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय कमिशन तयार करण्याची मागणी केली होती. तिवारी म्हणाले होते, या आयोगाचे अध्यक्ष सुप्रीम कोर्टाचे सेवानिवृत्त न्यायाधीश असावेत. या व्यतिरिक्त हायकोर्टाचे दोन सेवानिवृत्त न्यायाधीश असावेत. या आयोगाने पुरावे गोळा करून योग्य वेळी सुप्रीम कोर्टात अहवाल सादर केला पाहिजे. तिवारी यांच्या याचिकेत हिंसाचार आणि राष्ट्रीय ध्वजाचा अवमान करण्यास जबाबदार असलेल्या व्यक्ती आणि संघटनांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली होती. कोर्टाने अजून एक याचिका फेटाळली आहे. ज्यामध्ये मीडियाला आदेश देण्याची मागणी केली होती, की त्यांनी कोणत्याही पुराव्याशिवाय शेतकर्‍यांना अतिरेकी म्हणू नये. अ‍ॅड. मनोहर लाल शर्मा यांनी याचिकेत मागणी केली होती, की या संबंधी अ‍ॅथॉरिटी आणि मीडियाला निर्देश देण्यात यावेत. जर कोणी पुरावे न घेता शेतकरी संघटना आणि आंदोलकांना अतिरेकी म्हणत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जावी. त्यांनी हा देखील दावा केला होता की, शेतकर्‍यांच्या आंदोलनादरम्यान हिंसेचा कट रचण्यात आला होता. कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे.
दरम्यान,नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांनी 6 फेब्रुवारीला भारत बंदची हाक दिली आहे. शेतकर्‍यांकडून राज्यांमध्ये तसेच महामार्गावर तीन तासांसाठी चक्का जाम आंदोलन केलं जाणार आहे. या दरम्यान भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारला निर्णय घेण्यासाठी ऑक्टोबरपर्यंत वेळ दिला असून भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्याचा इशारा दिला आहे. केंद्र सरकारने जर आमच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही मोठी ट्रॅक्टर रॅली काढू असं ते म्हणाले.आम्ही सरकारला ऑक्टोबरपर्यंतची वेळ दिली आहे. जर त्यांनी आमचं ऐकलं नाही तर आम्ही 40 लाख ट्रॅक्टर घेऊन देशभरात रॅली काढू. एका राज्यातून दुसर्‍या राज्यात आम्ही प्रवास करू. येथील आंदोलन देखील सुरू राहणार आहे. जोपर्यंत कायदे मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत माघार घेणार नाही, असं राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे. झारखंडचे कृषिमंत्री बादल पारेख यांनी गाझीपूर सीमेवर भेट घेतल्यानंतर राकेश टिकैत यांनी हे वक्तव्य केलं आहे.

दीप सिद्धूवर 1 लाखाचे बक्षीस:  
26 जानेवारीला ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसेप्रकरणी पोलिसांनी बुधवारी मोठी घोषणा केली. त्यांनी म्हटले आहे, की दीप सिद्धू आणि दुसरे आरोपी जुगराज सिंह, गुरजंट सिंह यांच्याविषयी माहिती देणार्‍यांना 1-1 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल, यासोबतच जजबीर सिंह, बुटासिंह, सुखदेव सिंह आणि इकबाल सिंह यांच्यावर 50-50 हजार रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले आहे. हे सर्व लाल किल्ल्यामध्ये झालेल्या हिंसेचे आरोपी आहेत आणि ते फरार आहेत. यापूर्वी पोलिसांनी मंगळवारी 12 फोटो जारी केले आहेत. यामध्ये लाल किल्ल्याची तोडफोड करणारे दिसत आहेत.6फेब्रुवारीच्या हाक्केने देशातील शेतकरी एक होत आहे. हे आंदोलन गाव शेहर येते होणार असे वातावरण बनले आहे. 

ताज्या बातम्या

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...