Home / चंद्रपूर - जिल्हा / पीसीपीएनडीटी कायद्याची...

चंद्रपूर - जिल्हा

पीसीपीएनडीटी कायद्याची गांभिर्याने अंमलबजावणी करणे आवश्यक - डॉ. निवृत्ती राठोड

पीसीपीएनडीटी कायद्याची गांभिर्याने अंमलबजावणी करणे आवश्यक - डॉ. निवृत्ती राठोड

चंद्रपूर(जिल्हा-प्रतिनिधी) : समाजात मुलींचे प्रमाण वाढावे व भ्रुणहत्येला आळा घालण्यासाठी गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व (लिंग निवडीस प्रतिबंध) सुधारणा अधिनियम 2003 (पीसीपीएनडीटी) अंमलात आला आहे. संबंधित रुग्णालये व सोनोग्राफी केंद्रांनी या कायद्याची अतिशय गांभिर्याने अंमलबजावणी करावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी स्पष्ट केले.

जिल्हा सामान्य रुग्णालयात पीसीपीएनडीटी  जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी डॉ. पल्लवी इंगळे, सहाय्यक प्राध्या. डॉ. दिप्ती श्रीरामे, क्ष- किरण तज्ज्ञ डॉ. जी. आर. पाटील, ॲङ मंगला बोरीकर आदी उपस्थित होते. भ्रुणहत्येसारख्या अपप्रवृत्ती रोखण्यासाठी पीसीपीएनडीटी कायदा लागू करण्यात आला आहे, असे सांगून डॉ. राठोड म्हणाले, या कायद्यातील तरतुदींचे तंतोतंत पालन होणे आवश्यक आहे. कोणीही त्याचे उल्लंघन करता कामा नये. जिल्ह्यात असे प्रकार निदर्शनास आले तर संबंधित रुग्णालय किंवा सोनोग्राफी केंद्रावर कायदेशीर कारवाई प्रसंगी गुन्हा नोंद करण्यात येईल. तसेच सोनोग्राफी केंद्रांनी नुतणीकरणाचे प्रस्ताव एक महिन्यापूर्वी सादर करणे आवश्यक आहे. आपल्या केंद्रामध्ये कोणतेही बदल करावयाचे असल्यास त्याबाबत प्राधिकृत अधिका-यांची रितसर परवानगी घ्यावी. परवानगी न घेता सोनोग्राफी केंद्रामध्ये बदल केल्यास कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

जून महिन्यात जिल्ह्यात दर हजारी मुलींचे प्रमाण 834 तर मुलांचे प्रमाण 830 होते. या महिन्यात स्त्री – पुरुष प्रमाण 1005 एवढे राहिले आहे. तर जुलै महिन्यात हे प्रमाण 967 होते. जुलै महिन्यात दरहजारी मुलींची संख्या 841 तर मुलांची संख्या 870 असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...