खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) यवतमाळ : गरिबातील गरीब व्यक्तीची आर्थीक परिस्थिती सुधारून त्यांचे जीवनमान उंचावणे यासाठी शासनामार्फत मानव विकास योजना कार्यान्वित आहे. मानव विकास योजना राबविण्यासंदर्भातील शासन निर्णय 10 वर्षापुर्वी निघाला आहे, यात आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीला अनुसरून काय सुधारणा करण्यात यावी, कालबाह्य योजना रद्द करून नवीन योजनांचा समावेश करता येईल का, ज्यांच्यासाठी शासन योजना राबविते आहे त्यांच्या अपेक्षा व योजनेची अंमलबजावणी करणाऱ्यांच्या शासनाकडूनच्या अपेक्षा व सूचना या बाबी जाणून घेण्यासाठी विविध जिल्ह्यात दौरा करत असल्याचे राज्याचे मानव विकास आयुक्त नितीन पाटील यांनी काल सांगितले.
मानव विकास आयुक्त यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल भवन येथे काल दिनांक १८ नोव्हेंबर ,२०२१ रोज गुरुवार ला आढावा सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) अ.वि.सुने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस.चव्हाण, राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक श्री जोशी, प्रामुख्याने उपस्थित होते.
मानव विकास कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यातील कळंब, घाटंजी, मारेगाव, पांढरकवडा, आर्णी, महागाव, उमरखेड, पुसद व झरी या नऊ तालुक्यांचा समावेश आहे. आयुक्त नितीन पाटील यांनी यावेळी मानव विकास योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. यात तज्ञ महिला डॉक्टरांकडून गर्भवती महिलांची व 6 महिनेपर्यंतच्या वयोगटातील बालक व त्यांच्या मातांची आरोग्य तपासणी व औषधोपचार करणे, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्र्य रेषेखालील बाळांत महिलेला बुडित मजूरी देणे, ग्रामीण भागातील सर्वच मुलींना इ. आठवी ते बारावी पर्यंत शिक्षण घेणे शक्य व्हावे याकरिता गाव ते शाळा या दरम्यान वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देणे, शाळेतील गरजु मुलींना सायकलीचे वाटप करणे, तालुक्याचे ठिकाणी बालभवन विज्ञान केंद्र स्थापन करणे, माध्यमीक शाळेत अभ्यासिका सुरू करण्यासाठी सुविधा पुरविणे इ. विविध योजनांचा त्यांनी आढावा घेतला व त्याअनुषंगाने आवश्यक सूचना केल्या. बाळांत महिलेला बुडित मजूरी वेळेवर मिळावी असेही त्यांनी सांगितले. बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), शिक्षणाधिकारी (माध्यमिक), माविम, आरोग्य विभाग, वन विभाग, महिला व बालकल्याण इत्यादी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...