Home / चंद्रपूर - जिल्हा / सिमेंट उद्योगातील कामगारांना...

चंद्रपूर - जिल्हा

सिमेंट उद्योगातील कामगारांना किमान नवीन वेतनश्रेणी लागू होणार.

सिमेंट उद्योगातील कामगारांना किमान नवीन वेतनश्रेणी लागू होणार.

उमेश तपासे (चंद्रपूर-जिल्हा-प्रतिनिधी) दि. 14 : सिमेंट उद्योग व सिमेंटवर आधारीत उद्योगातील कामगारांना  किमान समान वेतन लागू केली असल्याने त्यांना अल्प वेतन मिळत आहे. त्यामुळे या परिपत्रकात बदल करून किमान वेतन यादीमध्ये दुरूस्ती करावी व  सिमेंट उद्योगातील कामगारांना 21 हजार रूपये किमान वेतन वाढ देण्यात यावी, अशी मागणी आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली. वडेट्टीवार यांची मागणी लक्षात घेता कामगार मंत्र्यांनी सदर परिपत्रकात बदल करण्याच्या सुचना दिल्या. तसेच कामगारांना 21 हजार रुपये किमान वेतन लागू करण्याचे तत्वतः मान्य करण्यात येत असल्याचे सांगितले.

सिमेंट उद्योगातील कामगारांना किमान वेतन वाढ व किमान वेतन परिपत्रकात दुरूस्ती करून किमान नवीन वेतन श्रेणी लागू करण्यासाठी कामगार मंत्री श्री.मुश्रीफ यांच्या दालनात ही बैठक पार पडली. यावेळी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल, कामगार आयुक्त श्री.कल्याणकर आदी उपस्थित होते.

यावेळी श्री.वडेट्टीवार म्हणाले, वाढती महागाई लक्षात घेता श्रमिकांना जीवन जगताना अडचणी येत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात अल्ट्राटेक, माणिकगड, एसीसी, अबूजा व दालमिया हे पाच सिमेंट उद्योग असून यामध्ये किमान 15 ते 20 हजार कामगार काम करीत आहे. सिमेंट उद्योग व सिमेंटवर आधारित उद्योगातील कामगारांना समान किमान वेतन लागू करण्याचे परिपत्रक लागू करण्यात आले आहे. या परिपत्रकाचा आधार घेऊन सिमेंट उद्योगामध्ये कार्यरत असलेल्या कामगारांना अल्प वेतन मिळत असल्याची बाब कामगार संघटनेच्या अध्यक्षा शिवानी वडेट्टीवार, विजय ठाकरे, किशोर भोयर, नारोटतं बाराई, सुधाकर तेजाने, गौतम भासरकर, सुनील धावस, दशरथ राऊत आदींनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच कामगारांना किमान 21 हजार रुपये वेतन देण्यात यावे, अशी मागणी केली. संघटनेची मागणी लक्षात घेत श्री. वडेट्टीवार यांनी तातडीने कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे बैठक लावून हा प्रश्न तातडीने निकाली काढण्यात येईल, असे आश्वासन दिले होते.

त्यानुसार आज मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत वडेट्टीवार यांनी सिमेंट उद्योगात काम करणाऱ्या कामगारांना परिपत्रकाच्या आधारे अल्प वेतन देऊन त्यांचे शोषण होत आहे. वाढती महागाई व कोरोनामुळे नागरिक त्रस्त झाले असून आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे कामगारांच्या किमान वेतनात वाढ करणे आवश्यक आहे. त्यासाठी कामगारांना लागू करण्यात आलेल्या समान किमान वेतन परिपत्रकात बदल करून सिमेंट उद्योगतील कामगारांना नवीन वेतन श्रेणी लागू करणे, 21 हजार रुपये किमान वेतन देण्यात यावे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, कामगारांना कोणत्याही परिस्थीतीत पुरेसे किमान वेतन मिळणे आवश्यक आहे. सध्या कोरोनामुळे कामगार वर्ग अडचणीत आहे. त्यांना दिलासा देणे आवश्यक आहे. सिमेंट उद्योगातील ठेका श्रमिकांबाबत किमान वेतन समितीसमोर वेतन वाढीबाबत शासनाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे कार्यवाही करावी, असे निर्देश श्री. मुश्रीफ यांनी दिले.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...