Home / महाराष्ट्र / जि.एस.आईल मिल कंपनीतिल...

महाराष्ट्र

जि.एस.आईल मिल कंपनीतिल 11 करोड रुपयाचे साहित्य लंपास करणाऱ्या  मुख्य आरोपीस एक वर्षा नंतर अटक

जि.एस.आईल मिल कंपनीतिल 11 करोड रुपयाचे साहित्य लंपास करणाऱ्या  मुख्य आरोपीस एक  वर्षा नंतर अटक

जि.एस.आईल मिल कंपनीतिल 11 करोड रुपयाचे साहित्य लंपास करणाऱ्या मुख्य आरोपीस एक वर्षा नंतर अटक, आरोपीस पाच दिवसाची पोलीस कोठडी

वणी : येथिल जि.एस.आईल मिल कंपनीतुन तब्बल ११ करोड २३ लाख ९९ हजार रुपयाचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले होते.या प्रकरणी दि.२ जानेवारी २०२० गुरुवारला सिकंदराबाद येथिल स्टेट बँक आफ इंडीयाच्या शाखा व्यवस्थापकांनी वणी पोलीस स्टेशन गाठुन तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरुन वणी पोलीसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करुन तपासात घेतला होता परतू ११ महिन्या नंतर मुख्य आरोपी पोलिसांच्या हाती लागला.

या बहुचर्चित जी एस आईल कंपनी मध्येमनोजकुमार अग्रवाल उर्फ मखरीया हे मँनेजिंग डायरेक्टर असलेल्या या जि.एस.आईल मिल कंपनीत संजयकुमार अग्रवाल उर्फ मखरीया, अजयकुमार अग्रवाल उर्फ मखरीया व उमेशकुमार अग्रवाल उर्फ मखरीया ईत्यादी संचालक होते. हि कंपनी सुरु करतांना या संचालकांनी आदिलाबाद येथिल स्टेट बँक आँफ इंडीया या शाखेतुन २२० करोड ९५ लाख रुपये कर्जाची उचल केली होती. परंतु ११ जुलै २०१२ पासुन या कंपनीच्या व्यवस्थापक मंडळाने नियमीत कर्जाची फेड न केल्याने जि.एस.आईल मिलचे खाते एनपिए झाले. परिणामी बँकेने आदिलाबाद व वणी येथिल कंपन्या आपल्या ताब्यात घेतल्या. यानंतर जुन २०१७ मध्ये सदर प्रकरण बँकेच्या सिकंदराबाद शाखेत गेल्यानंतर वणी येथिल जि.एस.आईल मिल मध्ये तैनात असलेले सुरक्षा रक्षक काढुन घेतले. परिणामी वणी परिसरातील भंगार चोरट्यांनी या कंपनीला टार्गेट केले होते. विशेष म्हणजे चोरट्यांनी मशिनचा वापर करुन दिवसा ढवळ्या या कंपनीतील साहित्यांच्या चोरीचा धुमाकुळ घातला होता.
यादरम्यान ९ फेब्रुवारी २०१७ ते १० मार्च २०१८ पर्यंत या कंपनीलील सुमारे ११ कोटी २३ लाख ९९ हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले होते.या घटनेची माहीती बँकेचे संचालक मनोज मखरिया यांना मिळताच त्यांनी बँकेत जावुन कंपनीतील साहित्यांची चोरी होत असल्याची माहीती दिली होती. परिणामी दि.२ जानेवारी २०२० गुरुवारला सिकंदराबाद येथिल स्टेट बँक आँफ इंडीयाचे व्यवस्थापक राधाक्रुष्ण मुक्कटीश्वरराव संका(५५)यांनी वणी पोलीस ठाणे गाठुन साहित्य चोरी प्रकरणी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरुन वणी पोलीसांनी भादंवी ३७९ नुसार चोरीचा गुन्हा दाखल करुन तपासात घेतला होता. एक वर्षापासून तपास सुरू होता. दरम्यान पोलिसांना मंगळवारी आदिलाबाद येथील पथक येऊन भेटले व त्यानी या प्रकरणी तपासाची चौकशी केली मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी शेख ईप्तेखार उर्फ बबलु शेख अहेमद (४९)रा.वणी यास सिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध भादंवीचे कलम ३७९,३५४, ४५७,३८०,३४ अन्वये गुन्हा दाखल केला व अटक करून आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
सदर कार्यवाही ही पोलिस अधिक्षक डाॅ.दिलीप पाटील भुजबळ, अप्पर पोलिस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, पोलिस निरीक्षक वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि/ गोपाल जाधव, सुनिल खंडागळे, सुधीर पांडे, रत्नपाल मोहाडे, पंकज उंबरकर, दिपक वांड्रसवार यांनी पर पाडली.

ताज्या बातम्या

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...