वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
दारूविक्री परवाना नूतनीकरण प्रक्रिया बुधवारपासून तीन ठिकाणी सुरू..
उमेश तपासे (चंद्रपूर ) : जिल्हात 1 एप्रिल 2015 रोजी दारू बंदी जिल्हा म्हणून घोषित झाल्यानंतर जिल्हात बाल गुन्हेगारी व महिला गुन्हेगारीचे मोठया प्रमाणात वाढ होत असल्याचे कारण पुढे करत पालकमंत्री यांनी मागील महिन्यात झालेल्या राज्याच्या कॅबिनेट बैठकीत दारूबंदी उठविण्याचे निर्णय सर्वानी एका मताने घेऊन जिल्हातील दारू बंदी उठविल्याचे ठाम पने सांगितल्या नंतर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे जिल्हात सर्वत्र अभिनंदन करण्यात आले.
चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय झाला. सहा वर्षांपूर्वी जिल्ह्यात दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. राज्य शासनेने अधिसूचना जारी केली त्यानंतर उच्च न्यायालयाच्या तीनही खंडपीठात कॅवेट दाखल करण्यात आली होती . आता उत्पादन शुल्क विभागाने ३१ मार्च २०१५ पर्यंत परवानगी असलेल्या दारूविक्री परवानाच्या नूतनीकरणाचे काम सुरु केले आहे. १६ जून २०२१ पासून चंद्रपूर, वरोरा आणि राजुरा येथे अर्ज स्वीकारले जाणार आहे. यासोबतच नवीन परवाना धारकांनाही अर्ज करता येणार आहे.गृह विभागाने ८ जून २०२१ रोजी अधिसूचना काढून परवाने नुतणीकरणाचा आदेश दिला. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त कार्यालयाकडून आदेश जारी करण्यात आले. अर्ज स्वीकारण्यासाठी तीन विभाग निश्चित झाली. अर्ज प्राप्तीची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीकडून अर्जाची छाणणी केली जाणार . त्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरु होणार अधीक्षक, उत्पादन शुल्क विभाग, चंद्रपूर सागर धोनकर यांनी ही माहिती जाहीर केली.
बुधवार 16 जून रोजी आज पासून 31 मार्च 2015 पर्यंत परवानगी असलेल्या दारूविक्री परवानाच्या नूतनीकरणाचे काम सुरु केले असून नवीन परवाना धारकांनाही अर्ज करता येणार आहे. 8 जून 2021 पासून महाराष्ट्र सरकार ने जिल्हातील दारू बंदी उठण्याचे परिपत्रक काढले असून त्या आदेशाचे पालन करत आज पासून या परवानगी असलेल्या दारूविक्री परवानाच्या नूतनीकरणाचे काम सुरु केल्या गेले असून आता लवकरच चंद्रपूर जिल्ह्यात दारू विक्री ची दुकानें बार सुरु होणार आहे : - सागर धोनकर (अधीक्षक उत्पादन शुल्क विभाग, चंद्रपूर)
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने दारूबंदीचा अभ्यास केला त्यानंतर निवृत्त सचिव रमानाथ झा समितीनेसुद्धा दारूबंदीचा अभ्यास केला. या समितीच्या अहवालानंतर राज्य शासनाने जिल्ह्यातील दारुबंद उठविण्याचा निर्णय घेतला.यातून जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याची चर्चा जोर धरू लागली. त्यानंतर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पालकमंत्री पदाची धुरा स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील दारूबंदी उठविली जाईल, असे उघडपणे वक्तव्य केले. दारूबंदी उठविण्यासाठी खासदार बाळू धानोरकर यांनीसुद्धा दारूबंदीची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली नाही म्हणून ठाम पने जाहीर केले होते . त्यामुळे बंदीच्या काळात कोट्यवधी रुपयांच्या दारूची अवैध विक्री जिल्ह्यात होत असल्याची तक्रार करण्यात आली. हजारोच्या संख्येने नवीन गुन्हेगार तयार झाले. बालकांपासून मोठया पर्यंत या अवैध दारू विक्री व्यवसायात लोक गुंतले गेले होते.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...