Home / महाराष्ट्र / पट्टेदार वाघाचा महिलेवर...

महाराष्ट्र

पट्टेदार वाघाचा महिलेवर घरात घुसून हल्ला, महिला गंभीर जखमी, खैरी(चक) येथील घटना.

पट्टेदार वाघाचा महिलेवर घरात घुसून हल्ला, महिला गंभीर जखमी, खैरी(चक) येथील घटना.

गुंजेवाही दिनांक 17:- सिंदेवाही तालुक्यातील 16 किमी अंतरावर अती दुर्गम भागात वसलेल्या खैरी(चक)या गावातील विदारक घटना काल रात्रीच्या सुमारास घडली आहे. पट्टेदार वाघाने रात्रौचा कानोसा घेऊन शेळ्यांना हल्ला करण्याच्या दृष्टीने त्या घरात प्रवेश केला. शेळ्या वर हमला करणार तेवढ्यात आवाजाची चाहुल लागताच घराचा दरवाजा उघडला तेव्हा लगेच त्याच पट्टेदार वाघाने हमला करून गंभीर या महिलेला जखमी केले. त्या महिलेचे नाव सुनंदा मेश्राम वय 60वर्ष.याच जखमी महिलेने आरडाओरड करताच घरातील व घराशेजारील मानसे जमा होताच त्या आवाजाने जवळ असलेल्या जंगलात पळून गेला. सिंदेवाही वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या खैरी गावाला लागूनच घनदाट जंगल आहे. त्याच जंगलात वन्यजीवांचा वास्तव्य आहे. त्या लगत मोठा जलाशय आहे. तेथेच हिंस्त्र प्राणी पाणी पिण्यासाठी येतात. खैरी या छोट्याशा गावात राहात असलेली आणि अठरा विश्व दारिद्र्यात जीवन जगत असलेली सुंनदा मेश्राम मोलमजुरी करून आपली उपजिविका करत असतात. अशातच थकुन भागुन स्वतः च्या घरात गाढ झोपेत असताना. तीच्या घरच्या शेळ्यांचा आवाज ऐकू येताच कुणी तरी घरी आल्याचा भास झाल्याने त्याच अवस्थेत घराचा दरवाजा उघडला. पहाताच समोरच असलेल्या पट्टेदार वाघाने हमला केला. लगेच त्या महिलेने आरडाओरड करताच कुंटूबातील व घराशेजारील मानसे जमाव होताच तो जंगलात पळून गेला. तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हि घटना गावात येवून हल्ला चढवला असल्याने या गावात भितीचे वातावरण पसरली. असुन दहशत निर्माण झाली आहे. मानव आणि वन्यजीव यांच्यात जणू काही संघर्षाचा सामना रंगला आहे की काय असे चित्र उभे ठाकले आहे. अशा परिस्थितीत या गावाशेजारी मोठे जलाशय व त्यालगत घनदाट जंगल असल्याने जंगलातले वन्य प्राणी गावात येऊ लागल्याने जगण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा गंभीर घटना घडत असल्याने वनविभागाकडुन जंगलात न जाण्याचा सल्ला दिला जात आहे. परंतु ह्या गंभीर हल्ल्याच्या घटना गावागावात घडत असल्याने आता गाव सोडून जायचे कां? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वनविभागाने अशा घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वाघांचा त्वरीत बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न करावे. अन्यथा मानव आणि वन्यजीव यांच्यात संघर्ष निर्माण होऊन कायदा हातात घेतल्या शिवाय पर्याय उरणार नाही. असे भयभीत झालेली जनता बोलुन दाखवीत आहेत.

ताज्या बातम्या

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 10 January, 2025

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...