Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / शिव-फुले-शाहू-आंबेडकरांच्या...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

शिव-फुले-शाहू-आंबेडकरांच्या चळवळीचा वारसा म्हणजे वंचित बहुजन आघाडी - दिलीप भोयर

शिव-फुले-शाहू-आंबेडकरांच्या चळवळीचा वारसा म्हणजे वंचित बहुजन आघाडी - दिलीप भोयर

रिपाईचे माजी तालुकाध्यक्ष, तर मनसेच्या एका सर्कल प्रमुखांचा वंचित मध्ये प्रवेश

वणी : शेतकरी, कष्टकरी, बारा बलुतेदार बहुजनांच्या उत्थानासाठी कोणत्या विचारांची गरज असेल तर ती छ. शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, छ. शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची निनांत गरज आहे. खऱ्या अर्थाने त्यांच्या विचारांच्या चळवळीचा वारसा  म्हणजे वंचित बहुजन आघाडी होय असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांनी केली. ते वंचित बहुजन आघाडीच्या आयोजित बैठकीत अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते. 

आगामी नगर परिषदेच्या निवडणुकी संदर्भात व वणी शहर कार्यकारणीच्या विषयावर ता.७ ऑक्टोबर २०२१ रोजी स्थानिक विश्राम गृहात दुपारी १.०० वाजता  बैठकीचे आयोजन वंचितचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाउपाध्यक्ष मंगल तेलंग, जिल्हा सल्लागार ऍड. विप्लॉव तेलतुंबडे, भारत कुमरे, आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी शहरातील पंचशील नगर, दामले नगर, भीम नगर, सम्राट अशोक नगर, वासेकर ले आउट, देशमूखवाडी, रंगनाथ नगर आदि वॉर्डात तात्काळ शाखा गठीत करण्याचे ठरले असून इतरही वॉर्डात लवकरच शाखा गठीत करण्याची जबाबदारी स्थानिक कार्यकर्त्यांवर देण्यात आली. यावेळी बैठकीचे सुत्रसंचलन प्रा. डॉ. आनंद वेले यांनी केले तर प्रास्ताविक किशोर मुन केले व आभार प्रा. ठमके सर यांनी मानले. यावेळी शहरातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

दोन माजी पदाधिकाऱ्यांचा वंचित मध्ये प्रवेश 

रिपाई गट ए चे माजी तालुकाध्यक्ष सिद्धार्थ नगराळे यांनी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नांदेपेरा लाठी सर्कलचे माजी सर्कल प्रमुख रघुवीर कारेकर या दोघांनी आपापल्या पार्टीला शेवटचा जय महाराष्ट्र करून वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांच्या नेतृत्वात वंचित मध्ये आपला प्रवेश केला त्यामुळे येणाऱ्या काळात वंचित मध्ये चांगला बदल घडण्याचे संकेत दिसून आले. अशी माहिती वंचितचे प्रसिद्धी प्रमुख रमेश तांबे यांनी कळविली आहे.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

वणीतील बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...