वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी मानीकगड पहाडावरील जिवती तालुक्यातील वणी खुर्द या गावात जादूटोण्याच्या संशयावरून सात जणांना भर चौकात लाकडाच्या खांबाला हात-पाय बांधून जबर मारहाण करण्यात आली.
यात वयोवृद्ध गटातील महिला आणि पुरुष यांचा समावेश आहे. शांताबाई कांबळे वय ( ५३ ) शिवराज कांबळे वय ( ७४ ) साहेबाराव हुके वय ( ४८) धम्मशिला हुके वय (३८) पंचफुला हुके वय(५५) प्रयागबाई हुके वय (६४) एकनाथ हुके वय (७०) या मारहाणीत गंभीर जख्मी झाले ही संतापजनक घटना व
अतिदुर्गम आदिवासी समजल्या जाणार्या जिवती तालुक्यातील वणी खुर्द येथे दिनांक २१ आॅगस्ट रोजी शनिवारला हि घटना घडली उपराेक्त घटना अतिशय निंदनीय असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे असे मत शेतकरी संघटनेचे जिवती तालुका अध्यक्ष सय्यद शब्बीर जागीरदार यांनी व्यक्त केले.
२१ व्या शतकात आज ही समाज अंधश्रध्देच्या आहारी गेल्याचे चित्र दिसून येत आहे.नरबळीचा प्रयत्न, अंधश्रद्धेतून लोकांना सामूहिक मारहाण असेही प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात घडत आहेत. जग एकीकडे विज्ञानवादाकडे जात असताना पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात अशाप्रकारे घटना घडत असतील तर याला जबाबदार शासन व प्रशासन तसेच राजकीय महत्त्वकांक्षी नेते तंटामुक्त समिती आहेत असा आरोप सय्यद शब्बीर जागीरदार यांनी केला. अतिशय अतिदुर्गम आदिवासी भाग समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यात शासन व प्रशासनाने विशेष लक्ष देऊन येथील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. लोकांच्या मनातून अंधश्रद्धा व जातीय द्वेष भावना दुर करणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या घटना रोखल्या जाऊन निष्पाप लोकांचा बळी जाणे बंद होईल. यासाठी शासन व प्रशासनाने तात्काळ जनतेचे प्रबोधन करावे व जातीय द्वेष भावना दूर होईल याकरिता प्रयत्न करावे अशी मागणी प्रसारमाध्यमांतून सय्यद शब्बीर जागीरदार यांनी केली.
सदरहु घटनेमध्ये जे काही दोषी असतील त्यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी व यापुढे अशा घटना घडणार नाही याची दक्षता घ्यावी अशीही मागणी सय्यद शब्बीर जागीरदार शेतकरी संघटना जिवती तालुका अध्यक्ष यांनी केली आहे .
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...