Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / गावगुंडांची दादागीरी...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

गावगुंडांची दादागीरी खपवुन घेतली जानार नाही, शेतातील उभ्या पिकाचे नुकसान करणाऱ्या गावगुंडांवर त्वरीत कारवाई करा, अन्यथा पोलीस स्टेशन समोर आंदोलन - कॉ.दिलीप परचाके

गावगुंडांची दादागीरी खपवुन घेतली जानार नाही, शेतातील उभ्या पिकाचे नुकसान करणाऱ्या गावगुंडांवर त्वरीत कारवाई करा, अन्यथा पोलीस स्टेशन समोर आंदोलन - कॉ.दिलीप परचाके
ads images
ads images

गावगुंडांची दादागीरी खपवुन घेतली जानार नाही, शेतातील उभ्या पिकाचे नुकसान करणाऱ्या गावगुंडांवर त्वरीत कारवाई करा, अन्यथा पोलीस स्टेशन समोर आंदोलन - कॉ.दिलीप परचाके

Advertisement

वणी : मुकुटंबन येथून जवळच असलेल्या तेजापूर येथील अतिक्रमण धारक शेतकऱ्यांच्या शेतातील पीक उपडून नासधूस करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करा,अन्यथा पोलीस स्टेशन समाेर आंदोलन करु, असा ईशारा महाराष्ट्र राज्य किसानसभेच्या वतीने आज दि.२८ जुलै ला पोलीस स्टेशन अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात केला आहे.

Advertisement

याबाबत सविस्तर असे की, तेजापूर येथील दलित आदीवासी व इतर मागासवर्गीय गैरआदिवाशीस यांचे मागील ३० वर्षांपासून अडेगाव येथील खंड क्र.२ वर अतिक्रमण करून शेतीमश्यागत करत आहे व त्यामधून उत्पन्न घेऊन आपल्या कुटुंबाची उपजीविका करीत आहे. या जिमिनीचा पट्टा मिळावा म्हणून किसांनसभा सतत आंदोलन करीत आहे. तसेच तेजापूर येथील शेतकऱ्यांनी पट्टा मिळण्याकरिता त्यांचा दावाअर्ज संबंधित विभागास पाठविला आहे, त्यावर अजूनही कोणतीही कारवाही झाली नाही, किंबहुना सदर शेतकऱ्यांना जमिनीवरून बेदखल करण्याचा कोणत्याही धोरणात्मक निर्णय झालेला नाही. तसेच शेतकऱ्यांना पट्टा देण्यासाठी सरकार विचाराधीन आहे. असे असतांना शेतकऱ्याच्या शेतामध्ये बळजबरीने घुसून त्यांचे पीक चारून व पीक उपडून पिकांची नासधूस करण्याचा आमोलन येथील काही गावगुंडांनी प्रयन्त केला आहे.

दि.२६ जून २०२१ ला काही लोकांनी शेतातील पिकात बकऱ्या घालून उभे पीक चारले याबाबत पोलीस स्टेशन मुकुटंबन मध्ये तक्रार दिली मात्र यावर कोणतीही कारवाही झाली नाही. त्यामुळे गुन्हेगारांची हिम्मत वाढली व दि.२६ जुलै २०२१ रोजी शेतामध्ये बळजबरीने घुसून शेतातील उभे पीक उपडून नासधूस करून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान केले आहे. याला मुकुटंबन पोलीस प्रशाशन जबाबदार असून सदर प्रकरणात गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे काम पोलीस प्रशासनाकडून होत आहे. असा आरोप किसानसभेने निवेदनातून केला आहे.

तसेच पोलीस विभाग राजकीय दबावात येऊन काम करीत असून शेतकऱ्यांच्या शेतातील पीक उध्वस्त करणाऱ्यां गुन्हेगारावर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे असेही निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे गुन्हेगारांना त्वरित अटक करा अन्यथा पोलीस स्टेशन मुकुटंबन समोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू प्रसंगी पोलीस स्टेशन ला घेराव घालू असा तिव्र ईशारा किसान सभेचे कॉ. शंकरराव दानव कॉ.ऍड. दिलीप परचाके कॉ. मनोज काळे यांच्यासह रक्तदान महादान फाऊंडेशनचे अध्यक्ष मंगेशभाऊ पाचभाई यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

वणीतील बातम्या