*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
Reg No. MH-36-0010493
सुमारे 62.46 टक्के मतदान; किरकोळ प्रकार वगळता कोठेही अनुचित प्रकार नाही
यवतमाळ (भारतीय वार्ता): यवतमाळ जिल्ह्यातील 925 ग्रामपंचायतींसाठी आज शांततेत मतदान झाले. 25हजार उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद असून किरकोळ प्रकार वगळता कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जिल्ह्यात 62.46 टक्के मतदान झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, मतमोजणी दि. 18 जानेवारी रोजी होणार आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील 925 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा झाली होती. त्यापैकी 223 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. ग्रामपंचायतींचा समावेश आहे. मात्र 925 ग्रामपंचायतींची निवडणूक लागली. या निवडणुकीत 25हजार उमेदवार आमने-सामने उभे होते. गेल्या आठ दिवसात जिल्ह्यात या निवडणुकीसाठी प्रचाराचा धुरळा उडाला होता.
ग्रामपंचायतीसाठी आजयवतमाळ तालुक्यात 66 ग्रामपंचायत मधील स्त्री 38812, पुरुष 40227असे एकूण मतदाते असून स्त्री 25821पुरुष 24755एकूण 50777मतदात्यानी मतदान केले त्याची टक्के 63.84झरी -जामणी एकूण 36ग्रामपंचायत करिता एकूण स्त्री 20547, पुरुष 21369एकूण 41916असून स्त्री 16122, पुरुष 14781असे 30903मतदारांनी मते दिली 73.73%वणी 75ग्रामपंचायत मधील स्त्री 37596पुरुष41848असे एकूण 79441मतदाते असून स्त्री 28826, पुरुष 26761एकूण 55587मतदारांनी मत दिली 69.97% उमरखेड एकूण ग्रामपंचायत 75 मधील स्त्री 56629, पुरुष 62262 एकूण 118891 मधूनस्त्री 40069 पुरुष 37108असे 77166मते दिली असून 64.9%, राळेगाव एकूण ग्रामपंचायत 46असून एकूण स्त्री 24949, पुरुष 26883असे एकूण 51832 असून त्या मधील एकूण स्त्री 18105, पुरुष 17565एकूण 35670मतदान 68.82%, पुसद एकूण ग्रामपंचायत 98असून स्त्री 73449, पुरुष 82309असे एकूण 155758असून त्यातील स्त्री 39176, पुरुष 40376एकूण मतदान 79552असून 51.07%, नेर एकूण ग्रामपंचायत 49असून स्त्री 33844, पुरुष 36221असे एकूण 70065 असून त्यात स्त्री 23537, पुरुष 22437असे एकूण मतदान 45974असून 65.62%मतदान झाले, मारेगाव एकूण 30ग्रामपंचायत मधील स्त्री 14681, पुरुष 13263असे एकूण 27944मतदाते असून त्यात स्त्री 10295, पुरुष 10549एकूण 20844मतदारांनी 74.59%, महागांव एकूण ग्रामपंचायत 71असून त्या मध्ये स्त्री 52704, पुरुष 58456असे एकूण 111161मतातील स्त्री 31452, पुरुष 32514इतर 1असे एकूण 63966मतदान झाले 57.54%, केळापूर एकूण ग्रामपंचायत 40त्यातील स्त्री 24356, पुरुष 25115 असे एकूण 49472 असून त्यात स्त्री 17805, पुरुष 16462 मतदार यांनी 69.27%मतदान दिले, कळंब एकूण ग्रामपंचायत 56त्यातील स्त्री 29639, पुरुष 31238असे एकूण 60877मधून स्त्री 19589, पुरुष 19047असे एकूण 38636 मतदान 63.47%मतदान केले, घाटंजी एकूण ग्रामपंचायत 49त्या मध्ये स्त्री 32213, पुरुष 34564असे एकूण 66771मधील स्त्री 22963, puru21233असे एकूण 44196मतदान 66.18%, दिग्रस एकूण ग्रामपंचायत 46मध्ये स्त्री 35598, पुरुष 38883 असे एकूण 74483मधून स्त्री 24430, पुरुष 23841असे एकूण 48271मतदान 64.81%झाले, दारव्हा एकूण ग्रामपंचायत 73असून त्या मधील स्त्री 47805, पुरुष 52861असे एकूण 100667मधून स्त्री 27357, पुरुष 28513 असे 55870मतदान झाले 55.5%, बाबुळगाव एकूण ग्रामपंचायत 50असून त्या मधून स्त्री 27527, पुरुष 28663असे एकूण 56190मधून स्त्री 19584, पुरुष 18609असे 38193झाले 67.97%, आर्णी एकूण ग्रामपंचायत 66मधून स्त्री 40353, पुरुष 44475 असे एकूण 84828 मधून स्त्री 28105, पुरुष 20161असे एकूण 48266 मतदान 56.9% तालुक्यात मतदान केंद्रांवर किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान झाले.
संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी 15 हजार 673 कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली होती. बहुतांश ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7 ते दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान 50 टक्केपेक्षा अधिक मतदान झाल्याचे चित्र दिसून येत होते.आशा वर्करणी आपली सेवा विना अनुदान कार्यातून केली सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांग व्यक्ती गर्भवती महिला यांच्यासाठी व्हील चेअर ठेवण्यात आल्या होत्या. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सुमारे 62.46 टक्के मतदान झाल्याचे वृत्त आहे.
यवतमाळ तालुक्यातील अर्जुना गावात मतदाना दरम्यान मतदान केंद्र क्र 312मध्ये वार्ड क्र2मधील मशीन मध्ये तांत्रिक बिघाड आला होता . काही वेळ विलंब मतदानावेळी पोलिसांनी मतदारांना मोबाईल घेऊन जाण्यास मज्जाव केल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. त्याचा फोटो काढण्यासही पोलिसांनी मज्जाव केल्यामुळे पदाधिकार्यांकडून पोलिसांवर दबाव होता की काय अशा चर्चांना ऊत आला होता.
जिल्हा परिषद, पंचायत समितीत शुकशुकाट- मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील बहुतांश विभागात काल शुकशुकाट जाणवत होता. जिल्हा परिषदेच्या बांधकाम दक्षिण, उत्तर शिक्षण, अर्थ, कृषी या विभागाचे कर्मचारी ग्रामपंचायत निवडणूक ड्युटीवर असल्याने हे विभाग ओस पडल्याचे चित्र दिसून येत होते. काही पदाधिकार्यांचे स्वीय सहाय्यक यांनाही निवडणुकीची ड्युटी लागली होती.
4 वाजेपर्यंत 60 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान: बहुतांश गावांमध्ये दुपारी 4 वाजेपर्यंत 60 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाल्याचे दिसून येत होते. वणी तालुक्यातील नायगाव पुनवट शिरपूर या ठिकाणी सकाळी लवकर मतदानासाठी मतदारांच्या मतदान केंद्राच्या बाहेर रांगा लागल्या होत्या.
वणी तालुक्यात निवडणूक शांततेत: तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडल्याची माहिती वणी तालुका पोलीस ठाण्याच्या सूत्रांनी दिली.
वणी तालुक्यात 74 ग्रामपंचायतींसाठी केंद्रांची उभारणी करण्यात आली होती. त्यासाठी 127 इमारती ताब्यात घेण्यात आल्या होत्या. पोलीस अधिकारी, पोलीस, होमगार्ड असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आज दिवसभरात निवडणूक प्रक्रिया असलेल्या तालुक्यातील गावात अथवा मतदान केंद्रावर कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
जिल्यातील 8101जागा साठी 17हजार पुरुष, 8हजार स्त्री उमेदवार रीगणात उभ्या होत्या त्याचे भाग्य 18जानेवारी रोजी गाव कारभारी म्हणून फुलनार आहे. ग्रामपंचायत निवडून उपजिल्हाधिकारी संगीता राठोड यवतमाळ यांनी आपले कर्तव्य पार पाडले.
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...
*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...
वणी :चांदा शिक्षण प्रसारक मंडळ,चंद्रपूर द्वारा संचालित जनता विद्यालय वणी . येथे आज दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी निरोप...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...