रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
नगर पालीकांवर वंचितांचा झेंडा फडकला पाहिजे -जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे
वणी: येत्या काही दिवसातच नगर परिषदेच्या निवडणुका घोषित होणार असून या निवडणुकीत वणी विधानसभेत असलेल्या नगर परिषदेवर व नगर पंचायतीवर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकला पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांनी आपली शक्ती पणाला लावून कामाला लागले पाहिजे असे संबोधन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे यांनी व्यक्त केले.
ते आज ता. ३ रोजी दु २ वाजता येथील नगाजी महाराज सभागृहात आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या तालुका कार्यकारणी, महिला कार्यकारणी, शहर कार्यकारणी, व युवा कार्यकारणी गठीत संदर्भातील बैठकीत उपस्थित झाले होते.
वंचित बहुजन आघाडीची जिल्हा कार्यकारणी नुकतीच गठीत होताच तालुका पातळीवरील कार्यकारणी गठीत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी जोमाने कामाला लागली आहे. वणी तालुका, पुरुष, महिला , शहर व युवा कार्यकारणी नव्याने गठीत करण्यासाठी नगाजी महाराज सभागृहात कोविड - १९ चे पालन करून वंचितचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे यांचे अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा महासचिव ऍड. श्याम खंडारे, जिल्हाउपाध्यक्ष मंगल तेलंग, अरुण कपिले, लक्ष्मण पाटील, मिलिंद पाटील, दिलीप भोयर, ऍड. विप्लोव तेलतुंबडे, सौ. करुणा कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्व कार्यकारणी साठी इच्छुकांचे अर्ज भरून घेतले. या कार्यक्रमचे प्रास्ताविक मिलिंद पाटील यांनी केले तर सुत्रसंचलन किशोर मुन यांनी केले व आभार प्रा. आनंद बेले यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कपिल मेश्राम, भारत कुमरे, राकेश तावडे, प्रकाश मून, डोंगरे, ओमेष परेकर, बाळू निखाडे, नगराळे अजय खोब्रागडे, नरेंद खोब्रागडे, अनिल पथाडे , शारदा मेश्राम, रेखा पाटिल, सुजाता नगराळे आदींनी परिश्रम घेतले.
वणीतील दोन नेत्यांचा वंचित मध्ये प्रवेश येथील मुस्लिम समाजाचे जेष्ठ नेते लेखक विचारवंत जिया अहेमद व आदिवासी समाजाचे नेते गेडाम यांचा आज वंचित बहुजन आघाडीचे जीलाध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करण्यात आला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे वंचितची ताकत चांगलीच वाढणार आहे.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...