Home / महाराष्ट्र / ससऱ्याने सुनेच्या भावाला...

महाराष्ट्र

ससऱ्याने सुनेच्या भावाला चाकूने भोसकले, मद्यपी सासऱ्याच्या असा हि कर.

ससऱ्याने सुनेच्या भावाला चाकूने भोसकले, मद्यपी सासऱ्याच्या असा हि कर.

वणी: विधवा बहिणीला घेऊन रेशनचे साहित्य आणण्याासाठी गेलेल्या भावावर बहिणीच्या सासऱ्याने चाकूने हल्ला करण्याची घटना शुक्रवार 22 जानेवारी रोजी तालुक्यातील मारेगाव (कोरंबी) येथे घडली. संतोष माधव पिंपळकर रा. लाठी ता. वणी असे जखमी व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी वणी पो.स्टे. येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. चंद्रभान रामाजी भुसारी (वय 50 वर्ष) रा. मारेगाव (को.) असे आरोपीचे नाव आहे.

संतोष माधव पिंपळकर रा. लाठी ता. वणी यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्यांची मोठी बहीण उज्ज्वला हिचे लग्न 2008 मध्ये मारेगाव (को.) येथील महादेव भुसारी सोबत झाले. तिला दोन अपत्य असून तिच्या पतीचे 2018 मध्ये हार्टअटॅकने निधन झाले. पतीच्या मृत्यूनंतर तिचा सासरा चंद्रभान रामाजी भुसारी हे नेहमी तिला त्रास द्यायचे. सासऱ्याच्या त्रासामुळे उज्ज्वला आपल्या दोन्ही मुलांना घेऊन चार महिन्यांपूर्वी माहेरी राहायला आली. उज्जवलाचे रेशनकार्ड मारेगाव (को.) चे असल्यामुळे ती दर महिन्याला भावासोबत मारेगाव (को.) येथे जाऊन रेशन उचलत होती.
दि.22 जानेवारी रोजी संतोष आपल्या बहिणीला दुचाकीवर बसवून रेशन घेण्यासाठी मारेगाव (को.) येथे पोहचले. त्यावेळी बहिणीचा सासरा चंद्रभान रामाजी भुसारी दारु पिऊन तिथे पोहोचला. त्याने सुन उज्ज्वला यास अश्लील शिवीगाळ करुन मारून टाकण्याची धमकी दिली. तसेच आरोपी हा चाकू घेऊन आपल्या सुनेच्या अंगावर धावून गेला. त्यावेळी संतोष हा आडवा आला असता आरोपीने त्याच्या हातावर चाकूने वार केला. चाकूच्या हल्ल्यात फिर्यादी संतोष माधव पिंपळकर याच्या डाव्या हाताच्या तळहातावर जखम होऊन रक्त लागले.

सर्व प्रकरणाबाबत फिर्यादी संतोष माधव पिंपळकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी चंद्रभान रामाजी भुसारी (वय 50 वर्ष) रा. मारेगांव (को.) विरुद्द कलम 324, 504, 506 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी 02 January, 2025

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी

झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी. 02 January, 2025

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी.

वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...