Home / महाराष्ट्र / शेतकर्‍यांनी केंद्राचा...

महाराष्ट्र

शेतकर्‍यांनी केंद्राचा प्रस्ताव फेटाळला

शेतकर्‍यांनी केंद्राचा प्रस्ताव फेटाळला

शेतकरी पाकिस्तानी नाहीत,  केंद्रानं त्यांचं ऐकावं : अण्णा हजारे

भारतीय वार्ता  : नव्या कृषी कायद्याच्या  विरोधात आंदोलन करणारे शेतकरी मागे हटण्यास तयार नाहीत. सरकारने पाठवलेला बुराडी मैदानात आंदोलन करण्याचा प्रस्ताव शेतकर्‍यांनी फेटाळून लावला आहे. सरकारने आमच्या आंदोलनाचा अपमान केला असल्याचे म्हणत शेतकर्‍यांनी सरकारवर हल्लाबोल केला. बुराडी मैदान हे मैदान नसून खुला तुरुंग असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. दरम्यान, आंदोलक शेतकर्‍यांनी दुपारी दोन वाजता बैठक घेतली. तत्पूर्वी त्यांनी सरकारचा बुराडी मैदानात आंदोलन करण्याबाबतचा प्रस्ताव फेटाळून लावला. 
आम्ही संपूर्ण व्यवस्थेसह आलो आहोत. आमच्याकडे 4 महिने पुरेल इतके रेशन आहे. आम्ही बुराडी मैदानात आंदोलन करणार नाही. आम्हाला रामलीला मैदान किंवा जंतरमंतरवर आंदोलन करण्यासाठी सरकारने जागा द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. आंदोलक शेतकर्‍यांनी दिल्लीतील बुराडी मैदानात आंदोलन करावे, असा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी शेतकर्‍यांपुढे ठेवला होता. त्यानंतर सरकार तत्काळ चर्चेसाठी तयार असल्याचे त्यांनी म्हटले होते. परंतु शेतकरी नेत्यांनी अमित शहा यांचा हा प्रस्ताव धुडकावून लावला होता. अमित शहा यांनी चर्चेसाठी बुराडी मैदानात आंदोलन करण्याची अट घालणे गैर असून त्यांनी अशी अट घालायला नको होती, असे शेतकरी नेत्यांनी म्हटले आहे. आम्ही अटीविना सरकारशी चर्चा करू इच्छितो, असे शेतकर्‍यांनी सांगितले. यानंतर केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी मोर्चा सांभाळत शेतकर्‍यांना चर्चेचे निमंत्रण दिले आहे. आता यावर शेतकरी काय पाऊल उचलतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी समर्थन केले आहे.
आज शेतकरी आणि सरकारची स्थिती भारत पाकिस्तानप्रमाणे झाली आहे. जसे निवडणुकांच्या वेळी नेते शेतकर्‍यांच्या घरांमध्ये, शेतांमध्ये मते मागायला जातात, तशाच प्रकारे त्यांच्या समस्यांवरही चर्चा करा, असे अण्णा हजारे म्हणाले.
आज शेतकरी अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत. परंतु त्यांच्या हातून काही हिंसाचार घडला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? शेतकरी पाकिस्तानी नाहीत. सरकारने त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. शेतकरी इतक्या दिवसांपासून आंदोलन करत आहेत हे देशाचे दुर्दैव आहे. जे शेतकरी आंदोलन करत आहेत ते पाकिस्तानी नाहीत. आपल्याच देशातील आहेत.  शेतकर्‍यांवर जो पाण्याचा मारा करण्यात आला तो अयोग्य होता. आज शेतकर्‍यांसोबत जे काही घडत आहे ते भारत-पाकिस्तान संघर्षाप्रमाणे झाले आहे. शेतकरी देशाचे शत्रू नाहीत. त्यांच्या आंदोलनातून मार्ग काढणे आवश्यक आहे. सरकारला विसरता कामाचे नाही.

ताज्या बातम्या

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...