वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
दुर्गापूर येथील दुर्घटनेतील मृतकांच्या कुटूंबियांना मुख्यमंत्री निधीतुन अर्थसहाय्य मिळण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर करावा –मुनगंटीवार यांची जिल्हाधिका-यांकडे मागणी
चंद्रपूर : दुर्गापूर येथे १२ जुलै रोजी जनरेटर मधील गॅस गळतीमुळे रमेश लष्करे यांच्यासह त्यांच्या कुटूंबातील सहा जणांचा दुर्देवी मृत्यु झाल्याच्या घटनेसंदर्भात माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपा पदाधिका-यांसह लष्करे कुटूंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला. यावेळी मृतक रमेश लष्करे यांची आई श्रीमती नागम्मा लष्करे व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.
या दुर्घटनेत मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटूंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन अर्थसहाय्य मंजूर करावे या मागणीसाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची भेट घेत निवेदन सादर केले. मृतकांच्या कुटूंबियांना १० लाख रू. चे अर्थसहाय्य मिळण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री सचिवालयाला सादर करण्याच्या सूचना आ. मुनगंटीवार यांनी जिल्हाधिका-यांना केल्या. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी त्वरीत प्रस्ताव सादर करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
यावेळी आ. मुनगंटीवार यांच्यासह महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, उपाध्यक्ष रामपाल सिंह, चंद्रपूर तालुकाध्यक्ष हनुमान काकडे, जिल्हा परिषद सदस्य रोशनी खान, पंचायत समिती सभापती केमा रायपूरे, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास टेंभुर्णे, माजी सरपंच श्रीनिवास जंगमवार, संजय यादव, घनश्याम यादव, नामदेव आसुटकर, रामभाऊ गि-हेपुंजे, अर्चना रायपुरे, दिनेश मेश्राम, मनपा स्थायी समिती सभापती रवि आसवानी, नगरसेवक संजय कंचर्लावार आदींची उपस्थिती होती.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...