वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
उर्जामंत्र्यांनी घेतला वीज उत्पादन विषयक कामांचा आढावा
चंद्रपूर, दि. 11 जुलै : येथील महाऔष्णिक विद्युत केंद्रातील राखेने भरलेल्या रेल्वेला हिरवी झेंडी दाखविल्यानंतर राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी वीज उत्पादन विषयक कामांचा आढावा घेतला. यावेळी खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, महानिर्मितीचे संचालक(खणिकर्म) पुरुषोत्तम जाधव, कार्यकारी संचालक(पर्यावरण व सुरक्षितता) डॉ.नितीन वाघ, मुख्य अभियंते पंकज सपाटे, श्री.देशपांडे, श्री. वाळके आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना ऊर्जामंत्री डॉ. राऊत म्हणाले, इरई नदीवरील सौर उर्जा प्रकल्प हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. हा प्रकल्प वेगाने कार्यान्वित होण्यासाठी पूर्णवेळ अधिक्षक अभियंत्याची तात्काळ नेमणूक करा. दर आठवड्याला तांत्रिक कामांचा आढावा कसोशीने होणे गरजेचे आहे. तसेच औष्णिक विद्युत केंद्रात संशोधन विकास विभाग सुरू करावा. तांत्रिक घटनांचे विश्लेषण, डाटाबँक विकसित करावी. रोबो आणि आर्टिफिशियल इंटिलीजन्स प्रणालीचा वापर करून अत्याधुनिक नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. जेणेकरून अशा संशोधनामधून आणि केस स्टडीमधून कंपनीची प्रगती होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.
ऊर्जामंत्र्यांना विद्युत केंद्राची माहिती देतांना मुख्य अभियंता पंकज सपाटे यांनी सांगितले की, मागील काही महिन्यात अनेक बाबींमध्ये प्रत्यक्ष लक्ष केंद्रित केल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत झाली व वीज उत्पादनाची कार्यक्षमता वाढली. रस्ता मार्गे वाहतूक होणाऱ्या कोळशामुळे प्रदुषणाची समस्या निर्माण होते. यावर मात करण्यासाठी कोळसा वाहून नेणा-या पाईप कन्व्हेयरचे काम पूर्णत्वास आले असून ऑगस्ट 2021 मध्ये या कामाचा प्रत्यक्ष शुभारंभ नियोजित आहे, असे ते म्हणाले.
बैठकीला औष्णिक विद्युत केंद्रातील विविध विभागाचे अधिकारी, अभियंते आदी उपस्थित होते. आढावा बैठकीपूर्वी ऊर्जामंत्री यांनी 500 मेगावाट क्षमतेच्या संच क्रमांक 8 व 9 च्या नियंत्रण कक्षाला भेट दिली आणि अभियंत्यांशी संवाद साधला.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...