शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
बंद बियरबार मधून अवैध दारू पुरविणाऱ्या बार मालकावर गुन्हा दाखल!
वणी: श्रीमंती असणे म्हणजे वाटेल ते करणे यातूनच बंद दरम्यान दारूच्या तस्करीतून व अवैध दारू विक्रीतून तगडे उत्पन्न मिळविण्यासाठी धडपड सुरू आहेत. शहरात तर अवैध दारू विक्रीला उधाण आले असून अवैध दारू विक्रेत्यांना मागील लॉकडाऊन काळापासून सुगीचे दिवस आले आहे. गल्ली मोहल्ल्यात वरिष्ठ हस्तकांच्या आशीर्वादाने अनेक अवैध दारू विक्रेते तयार झाले आहेत. पोलिसांनी आता या अवैध दारू विक्रेत्यांकडे नजर वळविली असून त्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांकडून त्यांच्या ठाव ठिकाणयांची माहिती घेतली जात आहे.
काल १९ एप्रिलला दुपारी ४ वाजता एसडीपीओ पोलीस पथकाने कार मधून दारू तस्करी करणाच्या तयारीत असलेल्या तस्कराला सावर्ला येथील व्ही व्ही बार जवळून कारसह ताब्यात घेतले आहे. एसडीपीओ पोलिस पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी सापळा रचून इंडिका कार मधून होणाऱ्या दारू तस्करीचा भांडाफोड केला आहे.
पोलिसांनी कार व कारमध्ये असलेला दारू साठा जप्त करून एका तस्कराला अटक केली आहे. या धाडीत पोलिसांनी १ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
वणी वरोरा रोड वरील व्ही व्ही बार अँड रेस्टोरंट येथून इंडिका कारमध्ये दारूचे बम्पर विक्रीकरिता जात असल्याच्या माहितीवरून एसडीपीओ पोलिस पथकाने सापळा रचून सावरला येथून कारसह दारू तस्कराला ताब्यात घेतले. कारमध्ये बी-७ कंपनीचे ७५० मिली.चे २३ बम्पर किंमत १५६४० रुपये, ब्लेंडर प्राईड कंपनीचे २ लिटरचे ६ बम्पर किंमत २०११० रुपये असे एकूण ३५ हजार ७४० रुपये किंमतीचे दारूचे बम्पर आढळून आले. पोलिसांनी इंडिका कार क्रं एम एच ३४ के ४५०१ किंमत १ लाख ५० हजार रुपये व दारू साठा असा एकूण १ लाख ८५ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कार्यवाहीत पोलिसांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक सुर्वे व सतीश गाडगे यांनाही सोबत घेतले. पोलिसांनी घटनास्थळावरून अविनाश सुधाकर सोनावणे (२६) रा. वणी याला अटक केली असून त्याच्यासह बियरबार मालक प्रवीण सरोदे व बादशाह याच्या विरुद्ध म.दा.का. च्या कलम ६५(अ)(ई) व सह कलम २६९, १८८ नुसार गुन्हे दाखल केले आहे.
सदर कार्यवाही जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक खंडेराव धरणे, एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात शिरपूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन लुले, नापोकॉ विजय वानखेडे, प्रदिप ठाकरे, इकबाल शेख, रवी इसनकर, परेश मानकर, संतोष कालवेलवार यांनी केली आहे.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...