Home / चंद्रपूर - जिल्हा / कृषी विभागाने हाती...

चंद्रपूर - जिल्हा

कृषी विभागाने हाती घेतली वनराई बंधारे बांधण्याची मोहीम

कृषी विभागाने हाती घेतली वनराई बंधारे बांधण्याची मोहीम

प्रत्येक तालुक्यात वनराई बंधारे बांधण्याचा संकल्प

चंद्रपूर दि. 20 ऑक्टोबर:  पाणी ही मौल्यवान नैसर्गिक साधन संपत्ती आहे. पाणी म्हणजे जीवन असे म्हटले जाते. या पार्श्वभूमीवर पाण्याचा संचय, नियोजन आणि संवर्धन या बाबी फार महत्त्वाच्या झालेल्या आहेत. त्यादृष्ट्रीने कृषी विभागाने नाल्यातून वाहत जाणारे पाणी अडविण्यासाठी वनराई बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेतली  असून प्रत्येक तालुक्यात हे बंधारे बांधण्यात येणार आहेत.

पाणी उपलब्ध असेल तर तिन्ही हंगामात शेतामध्ये विविध प्रकारची पिके घेता येऊ शकतात. वाढती लोकसंख्या व औद्योगिक प्रगतीबरोबरच कृषी उत्पादनासाठी उपलब्ध होणारे पाण्याचे प्रमाण हे दिवसेंदिवस कमी कमी होत आहे. कमी प्रमाणात पाऊस झाल्याने नदी,नाले कोरडे पडत चालले आहे. पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. सिंचनासाठी पाण्याचा वापर काटकसरीने व आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने करणे गरजेचे झाले आहे.  त्यामुळे नदी,नाल्यात शिल्लक असलेले पाणी थांबविणे रब्बी हंगामाच्या पिकांसाठी आवश्यक आहे.

हीच बाब विचारात घेऊन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे तसेच मंडळ कृषी अधिकारी भास्कर गायकवाड यांच्या संकल्पनेतून मौजा विचोडा येथील शंकर गौरी यांच्या शेतालगत 10 मीटर लांबीचा वनराई बंधारा लोकसहभागातून बांधण्यात आला.

या वनराई  बंधाऱ्यामुळे शेतालगतच्या 12 ते 13 शेतकऱ्यांच्या धान पिकाला शेवटचे पाणी उपलब्ध झाले आहे. त्यासोबतच या वनराई बंधाऱ्यामुळे पाणी अडविल्याने  शेतकऱ्यांना धान पिकाला पाणी देण्यासाठी पंपाद्वारे पाणीपुरवठा करणे शक्य झाले आहे. या पाण्यामुळे पिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळून शेतकऱ्यांच्या उत्पादनात निश्चितच समाधानकारक वाढ  होणार आहे. त्यासोबतच वनराई  बंधाऱ्यामधील पाणीसाठ्यामुळे या भागातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत मिळणार आहे.

या वनराई बंधाराच्या बांधकामाकरिता गावातील कृषी मैत्रीण श्रीमती रामटेके, रोशन रामटेके, कृषी सहाय्यक श्री. हनवते, कृषी पर्यवेक्षक श्री.बुग्गेवार यांनी विशेष योगदान दिले. तर बंधाऱ्याच्या बांधकामाकरिता लागणाऱ्या साहित्याची उपलब्धतेसाठी शेतकरी  शंकर पिंगे, उत्तम पिंगे, महादेव पाटील, श्री. कातकर तसेच गावातील इतर शेतकऱ्यांनी विशेष सहकार्य केले.

या नाल्यावर वनराई बंधाऱ्याचे बांधकाम करून पाणी अडविल्याने लगतच्या शेतकऱ्यांना पिकासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. बंधाऱ्याचे पाणी मिळाल्यामुळे शेतकरी सुखावले असून नाल्याचे पाणी वाया न जाऊ देता ते अडविण्याची शपथ उपस्थित शेतकऱ्यांनी घेतली.  अशाच प्रकारे तालुक्यात अनेक नाल्यावर बंधारे बांधण्याची संकल्पना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी उपस्थित शेतकऱ्यांसमोर मांडली.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...