आशिष साबरे (वणी-विभागीय-प्रतिनिधी) : देशात अजून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कायम आहे. सरकार तिसऱ्या लाटेची आशंका दर्शवत असताना डेल्टा प्लस विषाणू थैमान घालू लागला. कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट जगातील जवळपास १०४ देशांमध्ये पसरला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांनी ही माहिती दिली आहे. या वेगाने पसरणार्या व्हेरिएंटमुळे मृत्यू आणि संसर्ग होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
हा व्हेरिएंट लवकरच जगभरात पसरू शकतो, असे ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरून गेल्या काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने अनलॉक करण्याच्या प्रक्रियेतून जात असलेल्या देशांना फटकारले होते.
डेल्टाचा कोणाला धोका?
डेल्टा विषाणू हा एका प्रकारचा कोरोनाचा अंशच आहे. हा विशेषतः अशा लोकांमध्ये संक्रमित होत आहे, जे संरक्षण घेत नाहीत आणि धोक्याचे पाऊल उचलत आहेत. लसीकरण कमी असलेल्या देशांमध्ये सुद्धा परिस्थिती विशेषतः वाईट आहे, असे ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांनी म्हटले आहे. तसेच, डेल्टा आणि इतर वेगवान संसर्ग होणाऱ्या व्हेरिएंट प्रकरणांची विनाशकारी लहर चालत आहे, ज्यामुळे हॉस्पिटलमध्ये रुग्णांची भरती आणि मृत्यूची संख्या वाढत आहे. केवळ सार्वजनिक आरोग्य उपायांसह व्हायरसच्या सुरुवातीच्या लाटेंचा प्रतिकार करणाऱ्या देशांमध्ये आता उद्रेक झाला आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख म्हणाले आहेत.
आपल्याला बिघडत चाललेल्या सार्वजनिक आरोग्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे जीव, जीवनमान आणि जागतिक आर्थिक पुनर्प्राप्तीसाठी धोका बनू शकते. ज्या ठिकाणी लसी कमी आहेत आणि संसर्गाची लहर सुरू आहे. त्या ठिकाणी हे अत्यंत वाईट आहे, असे ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांनी सांगितले.