Home / चंद्रपूर - जिल्हा / ८३५ बीएएमएस वैद्यकिय...

चंद्रपूर - जिल्हा

८३५ बीएएमएस वैद्यकिय अधिका-यांना कार्यमुक्‍त करण्‍याचा निर्णय त्‍वरीत मागे घ्‍यावा – सुधीर मुनगंटीवार

८३५ बीएएमएस वैद्यकिय अधिका-यांना कार्यमुक्‍त करण्‍याचा निर्णय त्‍वरीत मागे घ्‍यावा – सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर : ८३५ बीएएमएस वैद्यकिय अधिका-यांना कार्यमुक्‍त न करता त्‍यांचा संबंधित ठिकाणी समावेश करण्‍यात येईल असे स्‍पष्‍ट आश्‍वासन सार्वज‍निक आरोग्‍य मंत्री राजेश टोपे यांनी दिले होते, मात्र अद्याप याबाबत शासनाने निर्णय घेतलेला नाही. गेल्‍या वर्षभरापासून कोविड काळात सदर बीएएमएस वैद्यकिय अधिका-यांनी सेवा दिलेली आहे. कोरोना योध्‍दा म्‍हणून त्‍यांनी काम केलेले आहे. अशावेळी त्‍यांना कार्यमुक्‍त करणे हा त्‍यांच्‍यावर अन्‍याय आहे. सार्वजनिक आरोग्‍य मंत्र्यांनी दिलेल्‍या आश्‍वासनानुसार ८३५ बीएएमएस वैद्यकिय अधिका-यांना कार्यमुक्‍त करण्‍याचा निर्णय मागे घ्‍यावा, अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शासनाकडे केली आहे. 

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बीएएमएस वैद्यकिय अधिका-यांशी ऑनलाईन बैठकीद्वारे संवाद साधला. राज्‍यातील ८३५ बीएएमएस वैद्यकिय अधिका-यांना कार्यमुक्‍त करण्‍याचा निर्णय राज्‍य सरकारने घेतल्‍यानंतर आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिनांक ५ मे रोजी सार्वजनिक आरोग्‍यमंत्री राजेश टोपे यांच्‍याशी दुरध्‍वनीद्वारे संपर्क साधुन सदर निर्णय मागे घेण्‍याची विनंती केली होती. ना. राजेश टोपे यांनी त्‍वरीत हा निर्णय मागे घेत बीएएमएस वैद्यकिय अधिका-यांना कार्यमुक्‍त करण्‍यात येणार  नाही असे स्‍पष्‍ट आदेश दिले होते. मात्र १० दिवसांचा कालावधी लोटूनही अद्याप हा निर्णय मागे घेण्‍यात आलेला नाही व सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्‍यात आला नाही, असे आ. मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे. आज कोरोना महामारीच्‍या काळात ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्‍य केंद्रांमध्‍ये त्‍यांना नियुक्‍त्‍या मिळणे आवश्‍यक आहे. त्‍याचप्रमाणे त्‍यांना सध्‍या देण्‍यात येणा-या वेतनात वाढ करण्‍याची सुध्‍दा आवश्‍यकता असल्‍याचे आ. मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे. ना. राजेश टोपे यांनी आश्‍वासन दिल्‍यानंतर आपण त्‍यांना रोज स्‍मरणपत्रे पाठवून हा निर्णय मागे घेण्‍याची विनंती केली आहे. याबाबत शासनाने गांभीर्याने बघण्‍याची आवश्‍यकता असल्‍याचे आ. मुनगंटीवार म्‍हणाले.

या बैठकीला डॉ. अक्षय जव्‍हेरी, डॉ. निशीगंधा, डॉ. अश्‍वीनी भोयर, डॉ. सचिन पांडव, क्षितीज झाडे, डॉ. सुरज पवार, डॉ. योगेश देवतळे, डॉ. खुशबु जोशी, डॉ. स्‍वप्‍नील हिवराळे, डॉ. विष्‍णु बावणे, डॉ. करिश्‍मा येडे, डॉ. स्‍वप्‍नील मुन, डॉ. मोरे, डॉ. दिपक ढोके, डॉ. अनामिका चंद्रगिरीवार, डॉ. नितीन मॅकलवार, डॉ. पायल वरभे, डॉ. संतोष गोफणे आदींची उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...