Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / वारगाव ते नवेगाव रस्त्याचे...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

वारगाव ते नवेगाव रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे ।। पहिल्या पावसाने प्रधानमंत्री सळक योजनेचे वाजले की बारा.

वारगाव ते नवेगाव रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे ।। पहिल्या पावसाने प्रधानमंत्री सळक योजनेचे वाजले की बारा.

अभियंता यांच्या कडून दर्जेदार रस्त्यावरील माहिती देण्यास टाळाटाळ.

वणी (न्युज डेस्क):  तालुक्यातील वारगाव ते नवेगाव प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्ता बांधकामात गैरप्रकार होत असून रस्ता बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून  4 कोटी रस्ता निर्मित काम 7 की. मी अंतर कामाचा मोबद्दला कोणाच्या घस्यात जातील हा प्रश्न निकृष्ट दर्जाच्या प्रकारावरून विचारल्या जात आहे.

वारगाव ते नवेगाव प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून रस्त्याचे काम मंजूर असून खडीकरण व मजबुतीकरणा सह पुलांची कामे मंजूर आहे सद्यस्थितीत रस्त्याचे खडीकरणाचे काम सुरू आहे परंतु सदर काम तांत्रिक मापदंड झुगारून केल्या जात आहे.  जुना रस्ता खोदकाम न करता त्यावरच थातुरमातुर ओव्हर साईज गीटा गिट्टी टाकून त्यावर मुरमा ऐवजी आजूबाजूने खोदलेली माती चा वापर करण्यात येत आहे सदर रस्त्याच्या दबाई साठी रोलर चा वापर सुद्धा केल्या जात नाही आहे तसेच दबाई साठी पाण्याचाही वापर करण्यात आलेला नाही मुरमा ऐवजी माती व चुनखडीचा वापर केल्या जात असून आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेता शेजारी खोदून तीच माती रस्त्यावर वापरली जात आहे,  यासाठी कुठलीही शासकीय परवानगी घेण्यात आलेली नसून शासकीय रॉयल्टी चा भरणा न करता अवैध गौण खनिजाचा वापर या कामावर केला जात आहे.  सदर काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून कामात मोठा गैरप्रकार सुरू आहे सदर काम अतिशय थातूरमातूर पद्धतीने करण्यात येत असल्याने रस्ता बांधकाम सुद्धा दर्जाहीन होऊन रस्ता अल्पावधीतच खराब होण्याची शक्यता आहे तसेच खडीकरणाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याने त्यावर होणारे मजबुतीकरणाचे काम सुद्धा निकृष्ट दर्जाचे होऊन रस्ता अल्पावधीतच खराब होणार आहे. यावर सर्व प्रथम प्रकाश प्रदीप जेऊरकर (भा. ज. पा स्वीकृत सदस्य) यांनी व याबाबत परिसरातील नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. 

 संबंधित कामावर शाखा अभियंता नारगे यांना  भ्रमनध्वनी वरून माहिती प्राप्त करण्याचा प्रयत्न केला असता, रींग टोन वर समाधान व्यक्त करण्यात आले, यामुळे यांचे पूर्णतः दुर्लक्ष असून कामाची साधी पाहणी सुद्धा केलेली नाही प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे काम ज्या कंत्राटदाराला देण्यात आले त्या कंत्राटदाराचे तालुक्यातील इतर कामेही मोठ्या प्रमाणात बोगस असून कामात गैरप्रकार आहे.  त्यामुळे सदर कामाची क्वालिटी कंट्रोल मार्फत चौकशी करावी अशी मागणी विजयभाऊ पिदूरकर माजी जि. प. सदस्य यांनी  भारतीय वार्ता पोर्टल सी बोलताना व्यक्त केली  व  सदर रस्त्याचं बांधकाम त्वरित थांबवून कामाचा दर्जा सुधारावा अशी ही मागणी नागरिकांची आहे.

 

 

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

वणीतील बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...