वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
जिल्हाधिका-यांनी घेतला दक्षता व नियंत्रण समितीचा आढावा
चंद्रपूर,दि. 22 जुलै : सामाजिक न्याय विभागांतर्गत जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या कामकाजाचा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात झालेल्या या बैठकीला अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. वायाळ, पोलिस उपअधिक्षक शेखर देशमुख, जिल्हा पुरवठा अधिकारी शालिग्राम भराडी, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक उपायुक्त अमोल यावलीकर आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरीता उपविभागीय तथा तालुकास्तरावर गठीत समितीच्या नियमित बैठका घ्याव्यात. शहरी तसेच ग्रामीण भागात गाव, रस्ते, मोहल्ला आदी ठिकाणांना जातीवाचक नाव असेल तर ते बदलविण्याकरीता ठराव घेऊन प्रस्ताव सादर करावा. अशा ठिकाणी पर्यायी नावांचे फलक लावल्यास बोलीभाषेत जातीवाचक नावांचा उल्लेख होणार नाही.
याबाबत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिका-यांनी त्वरीत कार्यवाही करावी. सध्या पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन स्थानिक स्तरावर तातडीच्या उपाययोजना कराव्यात. तसेच संपूर्ण यंत्रणेने अलर्ट राहावे. कोणीही मुख्यालय सोडू नये, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.
यावेळी जून 2021 पर्यंतच्या माहितीचा आढावा, अत्याचारग्रस्तांना आर्थिक सहाय्य मंजूर प्रकरणे, ॲक्ट्रोसिटी कायद्यांतर्गत पोलिस तपासावर प्रलंबित तसेच न्यायालयात प्रलंबित गुन्ह्यांची प्रकरणे, अत्याचारग्रस्त व्यक्तिंना जात प्रमाणपत्राचे वाटप, उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीची स्थापना, हाताने मैला उचलणा-या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन करण्याकरीता उपविभागीय दक्षता व सनियंत्रण समिती स्थापन करणे आदींचा आढावा घेण्यात आला.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...