Home / चंद्रपूर - जिल्हा / पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढ...

चंद्रपूर - जिल्हा

पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढ केंद्र सरकारने त्वरित मागे घ्यावी 

पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढ केंद्र सरकारने त्वरित मागे घ्यावी 

पंतप्रधान व पेट्रोलियम मंत्री यांना चंद्रपूर जिल्ह्यातील 15 तालुक्यात वि.रा.आंदोलन समितीचे निवेदन

जिवती (प्रतिनिधी) : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आज दिनांक 16 जूनला पेट्रोल-डिझेल-गॅस व इतर वस्तूंच्या प्रचंड व जीवघेण्या दरवाढी विरोधात पंतप्रधान मा.ना.नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री मा.ना.धर्मेंद्र प्रधान यांना पाठविण्यासाठी चंद्रपूर जिल्हाधिकारी आणि जिल्ह्यातील सर्व पंधराही तालुक्यात तहसीलदारां मार्फत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने माजी आमदार अँड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. कोरोना महामारीच्या काळात पेट्रोल - डिझेल - गॅस व इतर वस्तूंची प्रचंड झालेली वाढ त्वरित कमी करावी, अशी मागणी आज दिनांक 16 जूनला या निवेदनाद्वारे करण्यात आले.

कोरोना महामारी व लॉकडाऊन मुळे गेल्या सव्वा वर्षीपासून जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे. रोजगार, व्यापार, धंदा, कारोबार, व्यावसाय सारे व्यवहार ठप्प किंवा कमी झाले आहेत. त्यामुळे बेरोजगारी वाढली व लोकांचे उत्पन्न कमी झाले आहे. अशा स्थितीत केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल-गॅस यांच्या किंमती सतत वाढविल्या आहेत. त्यामुळे वाहतुक खर्च वाढून परिणामी महागाई वाढली आहे. या किंमती तात्काळ कमी करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या संदर्भात विदर्भ राज्य आंदोलन समितीने चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना समितीचे विदर्भ अध्यक्ष माजी आमदार अँड. वामनराव चटप, जिल्हाध्यक्ष किशोर पोतनवार, किशोर दहेकर,कपिल ईद्दे,मितीन भागवत,अनिल दिकोंडवार,हिराचंद बोरकुटे,पुरुषोत्तम आवळे,योगेश मुरेकर,अँड.चैताली कटलावार, नागसेन खंडार,अन्वर मिर्झा आलम यांनी निवेदन दिले. राजुरा येथे शेषराव बोंडे,प्रभाकर ढवस,रमेश नळे,मधुकर चिंचोलकर,दिलीप देरकर, भाऊजी कन्नाके, बळीराम खुजे, हसनभाई रिझवी, देवराव जूनगरी, कोरपना येथे अरुण नवले, नीलकंठ कोरांगे, अविनाश मुसळे,प्रवीण एकरे,रमाकांत मालेकर,मदन सातपुते,बंडू राजूरकर, अँड.श्रीनिवास मुसळे, बल्लारपूर येथे पराग गुंडेवार यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन दिले.

वरोरा येथे अँड.मोरेश्वर टेमुर्ड,सुधाकर जीवतोडे, अँड.शरद कारेकर,रमेश राजूरकर, चिमूर येथे डॉ.रमेश गजबे,अँड.मून,नरेंद्र बंडे, गोंडपिंपरी येथे अरुण वासलवार,तुकेश वानोडे,डॉ. संजय लोहे,अँड.प्रफुल्ल आस्वले,नोकेश कुत्तरमारे,अंकुर मल्लेलवार, गजानन बरडे,अँड.रूपेश सूर, बाळू नेवारे,शंकर पाल,जिवती येथे शब्बीर जागीरदार,अरविंद चव्हाण,देवीदास वारे,उद्भव गोतावळे, विजय चव्हाण, यांचे नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

भद्रावती येथे सुधीर सातपुते,सचिन सरपटवार,राजू बोरकर, ब्रह्मपुरी येथे सुदाम राठोड,सौ.लीना जोगे, मुल येथे कवडू येनप्रेडीवार, सावली येथे मनोहर गेडाम, नागभीड येथे विकास बोरकर,प्रशांत वाघाये, पोंभुर्णा येथे गिरधरसिंह बैस,अशोक सिडाम, सिंदेवाही येथे सतीश पवार यांचे नेतृत्वात निवेदन देण्यात आले.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...