शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (वणी विभागीय प्रतिनिधी): केंद्र सरकारने ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी व ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवावे, असे आवाहन बीड येथुन बोलतांना ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे यांनी केले. राष्ट्रीय ओबीसी महासंघ बीडच्या वतीने ओबीसी, व्हिजेएनटी यांच्या आरक्षण बचावासाठी बीड येथील स्व. गोपीनाथ मुंडे सभागृहात निर्धार मेळाव्याचे आयोजन आज (दि.२६) ला करण्यात आले होते.
या मेळाव्याला उद्घाटक म्हणून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ तर अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून बहुजन कल्याण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे पालकमंत्री बीड, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, आमदार महादेव जानकर, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार राजेश राठोड, नगराध्यक्ष भरतभूषण क्षीरसागर, माजी आमदार रामराव वडकुते, माजी आमदार, नारायण मुंडे, माजी आमदार भीमसेन धोंडे, माजी आमदार केशव आंधळे, सुशीला ताई मोराडे, शब्बीर अन्सारी, यांची प्रमुख उपस्थिती होती.
सोबतच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे, महासचिव सचिन राजूरकर, युवा महासंघाचे अध्यक्ष सुभाष घाटे, महासंघाचे राजकुमार घुले, प्रदेशाध्यक्ष प्रकाश भागरथ, युवा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष चेतन शिंदे, कर्मचारी महासंघाचे शाम लेडे, महिला महासंघाच्या कल्पना ताई मानकर, उपस्थित होते.
ओबीसींची जातनिहाय जनगणना करा, मंडल आयोगाची प्रभावी अंमलबजावणी करावी, ओबीसींना २७ टक्के राजकीय आरक्षण मिळवून द्यावे, केंद्र शासनाने कायदा करून आरक्षणाची मर्यादा रद्द करावी, केंद्रात ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी, महाज्योती संस्थेला गती देवून जिल्ह्याच्या ठिकाणी महाज्योतीचे कार्यालय सुरू करण्यात यावे, इतर मागासवर्गीय महामंडळासाठी ५०० कोटीची तरतुद करावी यासह विविध मागण्यांवर चर्चा व मार्गदर्शन पार पडले.
निर्धार मेळाव्याला हजारोंच्या संख्येने ओबीसी समाजबांधव उपस्थित होते. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बीड जिल्हाध्यक्ष अर्जुन दळे, कार्याध्यक्ष जालिंदर करडकर, कर्मचारी महासंघाचे बाळासाहेब दहिफले, विष्णू खेत्रे, महिला महासंघाच्या संगीता चव्हाण यांनी यशस्वीतेकरीता प्रयत्न केले.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...
निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...
*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...