Home / चंद्रपूर - जिल्हा / ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्‍पात...

चंद्रपूर - जिल्हा

ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्‍पात बल्‍लारपूर व चंद्रपूर या शहरांचा समावेश करावा    –आ. सुधीर मुनगंटीवार

ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्‍पात बल्‍लारपूर व चंद्रपूर या शहरांचा समावेश करावा    –आ. सुधीर मुनगंटीवार

सदर शहरांचा समावेश या प्रकल्‍पात त्‍वरीत करणार – ना. नितीन गडकरी
 
चंद्रपूर :
केंद्रीय भूपृष्‍ठ परिवहन मंत्री ना. नितीनजी गडकरी यांच्‍या माध्‍यमातुन ड्रीम प्रोजेक्‍ट ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्प प्रस्‍तावित करण्‍यात आला आहे. या प्रकल्‍पात विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वडसा, गोंदिया आदी शहरांचा प्रामुख्‍याने समावेश करण्‍यात आला आहे. परंतु औद्योगिकदृष्‍टया महत्‍वाच्‍या असलेल्‍या बल्‍लारपूर आणि चंद्रपूर या शहरांचा समावेश या प्रकल्‍पात करण्‍यात आलेला नाही. ना. नितीन गडकरी यांनी या विभागावर नेहमीच भरभरून प्रेम केले आहे. विकासकामांसाठी भरीव निधी उपलब्‍ध करून दिला आहे. या प्रकल्‍पात त्‍यांनी बल्‍लारपूर आणि चंद्रपूर या शहरांचा समावेश करावा अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी ना. नितीन गडकरी यांच्‍याकडे केली आहे. बल्‍लारपूर आणि चंद्रपूर या शहरांचा समावेश या प्रस्‍तावित प्रकल्‍पामध्‍ये त्‍वरीत करण्‍याचे आश्‍वासन ना. गडकरी यांनी यावेळी दिले.

दिनांक १५ जुलै रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांची भेट घेत त्‍यांना निवेदन सादर केले व चर्चा केली. ब्रॉडगेज मेट्रो या प्रकल्‍पात बल्‍लारपूर आणि चंद्रपूर या शहरांचा समावेश करण्‍याची आवश्‍यकता त्‍यांनी यावेळी प्रतिपादीत केली. बल्‍लारपूर हे महाराष्‍ट्रातील प्रमुख रेल्‍वे जंक्‍शन आहे. भारताच्‍या विभीन्‍न भागातून महत्‍वपूर्ण रेल्‍वे बल्‍लारपूर व चंद्रपूर या शहरातून ये-जा करतात. बल्‍लारपूर आणि चंद्रपूर येथील दोन्‍ही रेल्‍वे स्‍थानके रेल्‍वे विभागाच्‍या सर्वोत्‍तम रेल्‍वे स्‍थानकांच्‍या स्‍पर्धेत देशात अव्‍वल ठरली आहेत. या दोन्‍ही शहरांचा समावेश या प्रकल्‍पात झाल्‍यास या परिसराच्‍या विकासाला मोठी चालना मिळेल, अशी भूमीका आ. मुनगंटीवार यांनी यावेळी व्‍यक्‍त केली. सदर प्रस्‍तावित प्रकल्‍पात बल्‍लारपूर व चंद्रपूर या शहरांचा समावेश करण्‍यात येईल असे आश्‍वासन ना. नितीन गडकरी यांनी यावेळी दिले. यावेळी  फेडरेशन ऑफ ट्रेंड अँड कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चंद्रपूर चे पदाधिकारी रामजीवन परमार ,दिनेश नथवाणी, सुमेध कोत्तपल्लीवार , दिनेश बजाज, अनिल टहलीयानी यांची उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...