Home / महाराष्ट्र / बाटलीपायी नवरी गेली…!...

महाराष्ट्र

बाटलीपायी नवरी गेली…! नशेच्या धुंदीत नवरा लग्नमंडपात पोहोचला अन्…

बाटलीपायी नवरी गेली…! नशेच्या धुंदीत नवरा लग्नमंडपात पोहोचला अन्…

(सौ . लोकसत्ता) : लग्न म्हटलं रुढी पंरपरा आणि त्यात अनेकांचे रुसवे फुगवे आलेच. मात्र या सर्वांकडे दुर्लक्ष करून लग्नसोहळा पार पाडला जातो. सध्या करोनाचं संकट असल्याने वऱ्हाडी मंडळींच्या संख्येवरही मर्यादा आली आहे. त्यामुळे अनेक जण थोड्याथोडक्यात लग्नसोहळे पार पाडत आहेत. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये अशाच एका विवाहसोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र नवरा मुलगा आणि त्याच्या मित्रांना लग्नमंडपात दारूच्या नशेत पाहिल्यानंतर नवऱ्या मुलीला संताप झाला. २२ वर्षीय वधूने एका क्षणाचाही विलंब न करता लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी नवरा आणि वऱ्हाडी मंडळींना बंदीस्त केलं आणि लग्नासाठी दिलेल्या वस्तू परत मागितल्या. कुटुंबियांचं आक्रमक रुप पाहून नवऱ्याकडील मंडळींनी पोलिसांना बोलवलं आणि मध्यस्थी करण्याची मागणी केली.

प्रयागराजमधील प्रतापगढ शहरातील टिकरी गावात लग्नाचं आयोजन करण्यात आलं होतं. टिकरी गावातील शेतकऱ्याने आपल्या मुलीचं लग्न रविंद्र पटेल या व्यक्तीशी करण्याचं ठरवलं होतं. त्यानुसार दोन्ही बाजूच्या मंडळींनी बोलणी केली आणि दोघांकडून होकार आल्यानंतर लग्नाची तारीख ठरवण्यात आली. चौकशीत मुलगा व्यवस्थित असल्याचं त्यांना सांगण्यात आलं होतं. मात्र ऐन लग्नाच्या दिवशी नवरा मुलगा आणि त्याचे मित्र दारुच्या नशेत लग्न मंडपात आले. हा प्रकार पाहिल्यानंतर मुलीला संताप झाला. नवरा आणि त्याचे मित्र इतक्यावरच थांबले नाही तर लग्न मंडपात त्यांनी गोंधळही घातला. मात्र ठरलेलं लग्न मोडणार कसं असा प्रश्न वधू आणि तिच्या कुटुंबियांना पडला होता. त्यामुळे ते त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होते. अखेर संयमाचा बांध फुटला. वरमाला समारोहावेळी नवऱ्याने नवरीला नाचण्याचा आग्रह केला. मुलीने त्याला नकार दिल्याने नवरा मुलगा नाराज झाला. दारुच्या नशेत असल्याने त्याने आणखी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. याबाबतचं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे.

नवऱ्या मुलाचं वागणं बघून मुलीने लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर आधीच संताप झाल्याने नवरीच्या कुटुंबियांना नवरा मुलगा आणि त्याच्या नातेवाईकांना बंदीस्त केलं. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि प्रकरण शांत झालं. नवऱ्याच्या कुटुंबियांनी वधुच्या कुटुंबियांना रोख रक्कम आणि अन्य वस्तू पुन्हा परत करण्यास सहमती दर्शवली आहे.

ताज्या बातम्या

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 10 January, 2025

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...