Home / महाराष्ट्र / "जगदगुरु तुकोबांच्या...

महाराष्ट्र

"जगदगुरु तुकोबांच्या अस्थिंचासुद्धा शोषकांनी घेतला भयंकर धसका" : रामचंद्र सालेकर..

भारतीय वार्ता: या विश्वामध्ये एकमेव संत ज्यांचा जन्म तर भुतलावर झाला परंतु त्यांना संपविल्यानंतरही त्यांच्या अस्थि किंवा राख मात्र या भुतलावर कुठे असल्याचा पुरावाच पुसून टाकल्या गेला एवढा धसका त्यांच्या घातपाती मृत्यूनंतर या शोषकांनी त्यांच्या अस्थिच्या राखेचा घेतला होता. कारण अभंगरुपी घणाघाती वार शोषकांना सोसनं असह्य झाल्यामुळे या अभंगगाथा इंद्रायणी नदीत बुडवून नष्ट करुनही त्या जशाच्या तशा शोषित भारतीयांच्या मुखात राहू शकल्या एवढी ताकद या अभंगरुपी वारात होती, शोषकांवर वार करणारे तुकोबांचे लाखो वारकरी आजही तयार होवून या शोषकांवर वार करत आहे.
    जर का तुकोबांच्या अस्थि या अमुक ठिकाणी आहे  एवढे जरी आम्हा वारकऱ्यांना माहित असते तर त्या समाधीला नतमस्तक होवून आम्हा वारकऱ्यांमध्ये या शोषकांविरोधात विरश्री संचारली असती व या शोषकांची ही शोषीतव्यवस्था उधळून लावली असती एवढी ताकद त्यांच्या या अस्थित होती याची जाणीव या शोषकांना नक्की होती त्यामुळे  त्यांच्या समाधीपर्यंत कोणी पोहचूच नये याची व्यवस्था त्यांनी "पुष्पक विमान वैकुंठ" हे भ्रामक शस्त्र आम्हा वारकऱ्यांवर चालवून आम्हाला पराभूत केले. याची प्रचीती देहूला गेले असता प्रत्येक वारकऱ्याला झाल्याशिवाय राहत नाही.
   प्रत्येक भावीक संत महापुरुषांच्या समाधीस्थळाला नतमस्तक व्हायसाठी  अधीर झालेला असतो.कितीतरी त्रास सहन करत तिथपर्यंत जावून त्या समाधीवर डोक टेकवून धन्य होत असतो परंतु आम्ही वारकरी देहु ला गेलो असता तुकोबांच्या समाधीवर नतमस्तक होण्यासाठी मन  व्याकुळ होवून भिरभिर फिरते पण माझ्या तुकोबाच्या अस्थि समाधीरुपानं कुठेच दिसत नाही या अतीव दुःखानं खिन्न मनाने तुकाबांचे वास्तव्य असलेल्या घराचं व त्यांचा घातपात ज्या इंद्रायणीने बधितला तिच्या घाटाचं दर्शन घेवून परतावे लागते.
   आज देहुला तुकोबांच्या वाराला बोथड करुन ट्रस्टी व्यापाऱ्यांनी वैकुंठधाम, गाथा मंदिर सारखे मंदिरं उभे करुन त्यासभोवताल भक्तनिवास असे सोज्वळ नाव देवून होटलचा व्यवसाय सुरु केलेला पाहून मनोमन दुःख होते. व्यापारी गाथा मंदिरामध्ये संपूर्ण अभंगगाथा भिंतिवर लिहिल्या असे बोलले जाते परंतु बारीक निरिक्षण केले असता जे अभंग शोषकांवर घणाघाती वार करणारे आहे ते हेतूपुरस्सर टाळलेले असल्याचे दिसून येते.
   देहुवरुन माघारी फिरतांना मनोमन एकच विचार येतो की माझ्या तुकोबाच्या अस्ती या मातीत आहे एवढं जरी आम्हा वारकऱ्यांना माहित असतं तर इथून परतणारा प्रत्येक  भावीक स्फुरण घेवून हा शोषकांचा डोलारा उध्वस्त करणारा सच्च्या   वारकऱ्याच्या रुपान तुकोबाचा सैनिक होवून शोषकांना परास्त करुन त्यांचा डोलारा उध्वस्त केला असता यात यत्किंचितही शंका नव्हती. परंतु आम्हा वारकऱ्यांना पुष्पक विमानाने तुकोबांचे वैकुंठ गमन झाल्याच्या भ्रामक कल्पनात गुंतवून वारकऱ्यांचा वार बोथड केल्या गेला. हे शातीर शोषक त्यांच्या कपटकारस्थानात यशस्वी झाले याची आम्हा वारकऱ्यांना यत्किंचितही जाणीव होवू दिली नाही.

 


   जगदगुरु तुकोबांचा जन्मदिनच स्मृतीदिन म्हणून आम्हाला मानावा लागतो कारण तुकोबांचा घातपाती मृत्यू आम्हाला समजूच दिला नाही.या महान विभूतीला त्यांच्या या जन्मदिनी शतशः प्रणाम.

ताज्या बातम्या

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...