वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
देवानंद ठाकरे (घुग्घुस प्रतिनिधि) : प्रकल्पग्रस्तांवर अन्याय करणा-या कर्नाटक एम्टा कंपनीला धडा शिकविण्याची वेळ आली आहे. आज नवरात्रीतील अष्टमीचा दिवस आहे. या दिवशी आपण सर्व कर्नाटक एम्टा कंपनीला चेतावणी देण्यासाठी एकत्र आलो आहोत. 15 दिवसांपूर्वी कंपनीच्या प्रतिनिधींसोबत शासनस्तरावर बैठक झाली. 15 दिवसात प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करा असे सांगण्यात आले. मात्र कंपनीने अद्याप काहीही केले नाही. त्यामुळे कंपनीच्या विरोधात आंदोलनाचा शंखनाद आम्ही फुंकला आहे. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या कंपनीने गांभीर्याने घ्याव्या अन्यथा आंदोलन अधिक तिव्र करू, असा ईशारा विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.
आज दिनांक 13 ऑक्टोंबर रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात कर्नाटक एम्टा कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, डॉ. मंगेश गुलवाडे, नरेंद्र जीवतोडे, महामंत्री अंकुश आगलावे, चंद्रकांत गुंडावार, अहेतेशाम अली, डॉ. भगवान गायकवाड, विवेक बोढे, ब्रिजभूषण पाझारे, विशाल निंबाळकर, राहूल पावडे, संदीप आवारी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार पुढे म्हणाले, सतिश देठे या प्रकल्पग्रस्ताने आत्महत्या केली आहे. याला एम्टा कंपनीचे अधिकारी जबाबदार आहेत. बरांज खुली कोळसा खाणीशी संबंधित प्रकल्पग्रस्त शेतकरी व गावक-यांच्या समस्या निकाली काढण्यासाठी कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लिमी. व महाराष्ट्र शासन यांच्यात सन 2016 मध्ये करार झाल्यानंतरही पुनर्वसन कराराची अंमलबजावणी न करता कंपनी प्रशासन कोळसा उत्पादन करीत आहे. कंपनी प्रशासनाद्वारे पोलिस प्रशासनाचा धाक देवून मोठया प्रमाणात कोळसा उत्पादन सुरू आहे. कंपनीच्या या नकारात्मक भूमीकेमुळे प्रकल्पग्रस्त, शेतकरी, कामगार यांच्या असंतोष निर्माण झाला आहे.
दिनांक 15 डिसेंबर 2016 रोजी झालेल्या करारानुसार पुर्वीचे कार्यरत प्रकल्पग्रस्त कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांना सुधारित नियुक्ती पत्र देणे व 1 एप्रिल 2015 पासुनचे उर्वरीत थकित वेतन, भविष्य निर्वाह निधी तसेच नविन वेतन निर्धारण करून माहे डिसेंबर 2020 पासुनचे थकीत वेतन अदा करणे, उर्वरीत प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी कंपनीच्या सेवेत सामावून घेणे, बरांज मोकासा चेक बरांज या दोन्ही गावांचे पुनर्वसन करून मोबदला देणे या मागण्यांकडे कंपनी व्यवस्थान दुर्लक्ष करीत आहे. 50 टक्के शेतजमीन किंवा एकमुश्त चार लाख रूपये मदतीची घोषणा केली होती, त्यानुसार ताबडतोब चार लाख रूपये देण्यात यावे, 10 टक्के जमीन शिल्लक आहे त्यावर जायला रस्ता नाही ती कंपनी केपीसीएल किंवा एम्टा ने विकत घ्यावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...