Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / ओव्हरलोड वाहतूक बंद...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

ओव्हरलोड वाहतूक बंद करून संपूर्ण सिमेंट कॉंक्रिट रस्ता बांधण्याकरिता अडेगाव येथील युवकांचे बेमुदत उपोषण

ओव्हरलोड वाहतूक बंद करून संपूर्ण सिमेंट कॉंक्रिट रस्ता बांधण्याकरिता अडेगाव येथील युवकांचे बेमुदत उपोषण
ads images

खड्यात बसून युवकांचे आगळेवेगळे काल पासून आंदोलन सुरू

आशिष साबरे (वणी-विभागीय-प्रतिनिधी): तालुक्यातील गौनखनिजाने व्यापलेल्या अडेगाव, खडकी, गणेशपूर या परिसरात मोठ्या प्रमाणात खासगी खाणी आहेत. या खाणीतून मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होते त्यामुळे खडकी ते अडेगाव रस्त्याची चाळणी झाली आहे. या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे स्थानिक तरुणांनी अखेर खड्ड्यात बसून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. काल दिनांक  30 ऑगस्टपासून या आगळ्या वेगळ्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

अडेगाव ते खडकी रस्त्याची क्षमता 10 टनची आहे प्रत्यक्षात मात्र 34 ते 40 टन एवढ्या क्षमतेची वाहतूक या रस्त्याने होते. मात्र या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक होते. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. याबाबत प्रशासनाला अनेकदा पत्रव्यवहार कऱण्यात आला. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखेर मंगश पाचभाई यांच्या नेतृत्वात खडकी बस स्थानकाच्या बाजूला खड्यात बसून उपोषण सुरू करण्यात आले आहे.

अडेगाव-खडकी रस्त्याचे काँक्रिटीकरण, ओव्हरलोड वाहतूक बंद करावी, रस्त्यावरील नवीन पूल बांधावे, अवजड वाहतूक  दिवसाची बँड करून संध्याकाळी 6 नंतर सुरू करावी, संपूर्ण परिसरात वृक्षारोपण करण्यात यावे अशा विविध मागण्या आंदोलकांच्या आहेत. मागण्यांकडे लक्ष न दिल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. आंदोलनात राहुल ठाकूर, दत्ता लालसरे, गिरीधर राऊत, दिनेश जीवतोडे, निखिल देठे, दत्ता भोयर इ. सहभागी झाले असून त्यांना गावक-यांनी पाठिंबा दिला आहे.

ताज्या बातम्या

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...