Home / चंद्रपूर - जिल्हा / लॉईड्स मेटल कंपनी मधून...

चंद्रपूर - जिल्हा

लॉईड्स मेटल कंपनी मधून होणाऱ्या जड वाहनांची वाहतूक घुग्घूस शहरातील मुख्य मार्गावरून बंद करण्याची मागणी आम आदमी पार्टी घुग्घूस द्वारा करण्यात आली.

लॉईड्स मेटल कंपनी मधून होणाऱ्या जड वाहनांची वाहतूक घुग्घूस शहरातील मुख्य मार्गावरून बंद करण्याची मागणी आम आदमी पार्टी घुग्घूस द्वारा करण्यात आली.

देवानंद ठाकरे (घुग्घुस प्रतिनिधि) :  मागील काही वर्षा पासून घुग्घूस शहराला प्रदूषणा मध्ये अव्वल दर्जाचे स्थान मिळवून देण्याचे काम घुग्घूस येथील लॉईड्स मेटल & एनर्जी लिमिटेड कंपनी द्वारा करण्यात आले सोबतच घुग्घूस शहराला बिमाऱ्यांचे माहेर घर बनविण्याचे काम या कंपनी द्वारा करण्यात आले.ज्यामुळे शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये दमा, कॅन्सर, अटॅक, त्वचारोग, गर्भामधून च बाळ बिमार होणे, महिलांना मासिक पाळीचा त्रास, २-३ वर्षाच्या नवजात शिशूना ५००-६०० शुगर सारख्या आजाराना तोंड द्यावे लागत आहे सोबतच ऑक्सिजनचा कमतरतेमुळे झोपेतच मृत्यू होणे यासारख्या आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.इतकं सर्व असून सुद्धा या कंपनी मधून मोठ्या प्रमाणामध्ये अवैध्य रित्या जड वाहनांची वाहतूक घुग्घूस शहरातील मुख्य मार्गावरून करण्यात येत आहे. ज्यामुळे शहरातील नागरिकांना प्रदूषणाचा  त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या वाहतुकीमुळे ट्रॅफिक जाम सारखी समस्या सोबतच अपघाताचे प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहे. हे सर्व पाहता आम आदमी पार्टी घुग्घूस द्वारा जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर, सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर, लॉईड्स मेटल & एनर्जी लिमिटेड घुग्घूस, नगरपरिषद कार्यालय घुग्घूस यांना ही वाहतूक गावातून बंद करून नियमाप्रमाणे देण्यात आलेल्या मार्गाने वाहतूक करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली व ही वाहतूक शहरातून बंद झाली नाही तर येत्या काही दिवसांमध्ये आम आदमी पार्टी द्वारा याचा तीव्र विरोध करण्यात येईल. यावेळी शहर अध्यक्ष अमित बोरकर यांनी म्हटले की येणाऱ्या २०२२ मध्ये घुग्घूस शहराला पूर्णपणे प्रदूषण मुक्त करण्याचा संकल्प आम आदमी पार्टी ने केलेला आहे.
             त्यावेळी शहर अध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष अभिषेक सपडी, सचिव संदीप पथाडे, विकास खाडे, आशिष पाझारे, रवी शांतलावार, प्रशांत सेनानी, सागर बिऱ्हाडे, सारंग पिदुरकर, निखिल कामतवार, दिनेश पिंपळकर, सोनू शेत्तीयार,स्वप्नील आवळे, अभिषेक तालापेल्ली, संतोष सलामे, अंकुश उइके, प्रशांत पाझारे, सद्दाम शेख, अनुप नळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...