Home / महाराष्ट्र / आमदार निधी व उद्योगांच्या...

महाराष्ट्र

आमदार निधी व उद्योगांच्या सामाजिक दायित्व निधीतून साकारण्यात आलेले 100 बेडचे ऑक्सिजनयुक्त कोविड रुग्णालय सोमवारपासून रुग्णसेवेसाठी होणार सज्ज..

आमदार निधी व उद्योगांच्या सामाजिक दायित्व निधीतून साकारण्यात आलेले 100 बेडचे ऑक्सिजनयुक्त कोविड रुग्णालय सोमवारपासून रुग्णसेवेसाठी होणार सज्ज..

आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली भेट, रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा देण्याच्या सुचना

चंद्रपूर : आमदार किशोर जोरगेवार यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतील एक कोटी रुपये तसेच उदयोगांच्या सामजिक दायित्व निधीतून वन अकादमी, चंद्रपूर  येथे   साकारण्यात  आलेले  115 खाटांचे कोविड रुग्णालय उद्या सोमवार पासून रुग्णांना आरोग्यसेवा देण्यासाठी सज्ज होणार आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी आज रविवारी या रुग्णालयाच्या अंतिम टप्यात असलेल्या कामाची पाहाणी केली असून येथून रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी अशा सूचना केल्या आहे. यावेळी नोडल ऑफिसर रोहन घुगे, बांधकाम विभागाचे अभियंता रोठोड यांच्यासह माजी नगर सेवक बलराम डोडाणी, अजय जयस्वाल  तसेच रुग्णालयीन सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

          आमदार किशोर जोरगेवार यांनी कोविड रुग्णालयासाठी मनपाला दिलेला स्थानिक आमदार विकास निधीतील एक करोड रुपये आणि काही उद्योगांच्या सामजिक दायित्व निधीतून वन अकादमी, चंद्रपूर येथे 100 खाटांच्या ऑक्सिजन युक्त कोविड रुग्णालयाचे काम सुरु करण्यात आले होते. या कामासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचा चंद्रपूर महानगर पालिकेकडे सातत्याने पाठपूरावा सुरु होता तसेच या कामाकडे आमदार किशोर जोरगेवार यांचे लक्ष होते. मागील आठवडाभरापासून त्यांच्या वतीने सदर ठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी केल्या जात होती. येथील काम युध्द स्तरावर पुर्ण करण्याच्या सुचनाही त्यांच्या वतीने करण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर अतिशय कमी वेळात या रुग्णालयाचे काम पुर्ण झाले असून उद्या सोमवारपासून हे रुग्णालय कोरोना रुग्णांना आरोग्य सेवा देण्यास सज्ज होणार आहे.

          येथे 115 खाटा असून यातील 100 खाटा ह्या ऑक्सिजनयुक्त असणार आहे. दरम्याण आज रविवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी पून्हा एकदा सदर रुग्णालयाला भेट देत अंतिम टप्यात असलेल्या कामाची पाहाणी केली. यावेळी त्यांनी कोविड रुग्णांकरिता विक्रमी वेळेत सोई सुविधा युक्त रुग्णालय तयार केल्याबद्दल अधिकाऱ्यांचे कौतुक केले. जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनीही हे रुग्णालय लवकर सुरु व्हावे याकरिता  शिताफिचे प्रयत्न केलेत. या रुग्णालयाला तात्काळ प्रशासकीय मान्यता देत रुग्णालय सुरु करण्याची प्रक्रिया गतिशील करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. तसेच त्यांनी सदर रुग्णालयाची पाहणी करत येथील कामाचा आढावा घेतला होता.  सध्या ऑक्सिजन बेडसाठी रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामूळे आॅक्सिजन युक्त 100 खाटांचे हे रुग्णालय सुरु होताच रुग्णांची ऑक्सिजन बेड अभावी होत असलेली मोठी गैरसोय टळणार आहे. अशी आशा आमदार जोरगेवार यांनी व्यक्त केली आहे. ह्या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातलगांची दोन वेळेच्या जेवणाची व्यवस्था रूग्णालयातर्फे करण्यात येणार आहे. येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीबाबतची माहिती त्यांच्या नातलगांना देण्याची यंत्रणा असणार आहे. येथील सर्व वार्डमध्ये सी.सी.टीव्ही कॅमेरा लावण्यात आले असून सी.सी.टीव्ही च्या निगराणीत रुग्णांवर उपचार केले जाणार आहे. यापूर्वीही पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बेड संख्या वाढविण्याच्या दिशेने प्रयत्न केले होते.

ताज्या बातम्या

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 10 January, 2025

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...