खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी)
वणी : संघर्ष वाहिनी ,महाराष्ट्र द्वारे आयोजित जनजागृती रॅलीचे २५ नोव्हेंबर ला वणी येथे आगमन झालं असता, ओबीसी(व्हीजे,एनटी, एसबीसी) जातनिहाय जनगणना कृती समिती, वणी, झरी, मारेगाव तसेच विविध समाज संघटना मार्फत भव्य स्वागत करण्यात आले.
भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना इतर मागास प्रवर्गातील, विशेष मागास प्रवर्गातील काही जाती, तसेच भटक्या जमातीतील काही जाती आजही भटकतच आहे. राहायला घर नाही, शेती नाही, रोजगार नाही. यांचा अधिकृत डेटा केंद्र असो की राज्य सरकार असो यांच्याकडे नाही. भारताच्या संविधानाच्या कलम ३४० नुसार या ओबीसींची जातनिहाय जनगणना करून शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मुख्य प्रवाहात आणणे काळाची गरज आहे, इंग्रजांनी ओबीसींची जातनिहाय जनगणना केली आपलेच भारतीय राज्यकर्ते का करत नाही असे मत संघर्ष वाहिनीचे मुख्य संयोजक दिनानाथ वाघमारे यांनी व्यक्त केले. संघर्ष वाहिनीचे मिडिया प्रमुख मुकुंद अडेवार यांनीही भटक्या विमुक्तांची आणि ओबीसीची जातनिहाय जनगणना काळाची गरज यावर मार्गदर्शन केले, तसेच स्टुडंड राईट असोसिएशन ऑफ इंडिया,नवी दिल्ली चे अध्यक्ष उमेश कोर्राम यांनी विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधा, सवलती यावर तसेच आपल्या न्याय हक्कांसाठी संघटित राहून संघर्ष करावे, आपल्या मागण्या आणि सोयीसुविधा काय आहे हे विद्यार्थ्यांना माहिती असणे गरजेचे आहे असे म्हणाले. या संघर्ष वाहिनीच्या जनजागृती रॅली सोबत धीरज भीसीकर,राहुल पडाळ,पर्वतभाई रब्बारी,संजीव भूरे, अविनाश घोडे आदी होते, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओबीसी जातनिहाय जनगणना कृती समितीचे निमंत्रक मोहन हरडे गुरुजी, प्रास्तविक विदर्भ बेलदार समाज संघटनेचे प्रांतीय उपाध्यक्ष अरविंद गांगुलवार यांनी केले तसेच ओबीसी जातनिहाय जनगणना कृती समितीचे मार्गदर्शक प्रा.बाळकृष्ण राजूरकर यांनी कृती समितीची भूमिका विशद केली.तर आभार राकेश बरशेट्टीवार यांनी मानले.
यावेळी ओबीसी जातनिहाय जनगणना कृती समिती वणी-झरी-मारेगावचे अध्यक्ष-प्रदीप बोनगीरवार, कृती समितीचे मार्गदर्शक-पांडुरंग पंडिले, नारायण मांडवकर, सुरेश मांडवकर, अशोक चौधरी तसेच कृती समितीचे समन्वयक गजानन चंदावार, प्रवीण खानझोडे, दिलीप भोयर, विकास चिडे, प्रा. राम मुडे, विवेक ठाकरे, संदीप मुत्यलवार, प्रदीप बोरकुटे,कैलास बोबडे,जगदीश ढोके, नितीन मोवाडे, रवींद्र आंबटकर प्रा.अनिल टोंगे तसेच नगरसेवक राकेश बुग्गेवार,वंचीत बहुजन आघाडीचे मंगल तेलंग आणि विविध सामाजिक संघटनेचे संतोष कोमरेड्डीवार, विठ्ठल पडलवार, राजू बोईनपल्लीवार, रुपेश पेंदाने, ज्ञानेश्वर बोनगीरवार, राहुल पडाल, प्रवीण येलपूलवार, अखिलेश जंगीलवार, सागर बरशेट्टीवार, देविदास राऊलवार आदी उपस्थित होते.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...